भारतीय संघामध्ये अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर संपूर्ण जगात नाव कमावले आहे. परंतु हे नाव तसेच कायम टिकून ठेवण्यासाठी सतत उत्कृष्ट कामगिरी ही करावीच लागते. भारतीय संघातील मुख्य वेगवान गोलंदाज दीपक चाहर हा एक त्यापैकीच आहे. तो टी२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतो. चाहर सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो. ‘स्विंग’ या शैली साठी चाहर ओळखला जातो. नुकतीच त्यानी आपल्या कारकिर्दीवर एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
त्याने असे म्हटले आहे की, त्याच्या टी20 कारकिर्दीत फक्त एकाच सामन्यात वाईट प्रदर्शन झाले आहे. स्पोर्ट्स किडाशी बोलत असताना दीपक चाहरने सांगितले की, ‘एकाच सामन्यात माझे प्रदर्शन चांगले झाले नाही. मी आतापर्यंत एकूण 13 टी20 सामने भारतासाठी खेळले आहेत. याच दरम्यान दोन वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि एक वेळा ‘मॅन ऑफ द सिरीज’ म्हणून मला पुरस्कार मिळाला आहे. टी20 मध्ये कोणत्याही खेळाडूसाठी ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.’
‘माझा फक्त एकच सामना वाईट झाला होता. जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 48 धावा दिल्या होत्या. असे म्हणतात की, माझ्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील प्रदर्शन चांगले झाले नव्हते. परंतु, हे खरे नाही. माझा फक्त एक सामना वाईट झाला आणि हे कोणासोबतही होऊ शकतं. मला या गोष्टीचा आनंद होतोय की, लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत.’
दीपक चाहरची टी20 कारकिर्द
दीपक चाहर ने आतापर्यंत एकूण 13 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दरम्यान 7.56 इकॉनोमी रेटने 18 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर दिपक चाहरने आयपीएलमध्ये ही उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच पुरुषांच्याआंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रम आहे. त्याने 10 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध नागपूरमध्ये 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. दीपकला अगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता!! अजिंक्य रहाणेला भर गर्दीत चाहत्याने केले होते कीस, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
चहलने बॅट मागितल्यावर सूर्यकुमारने उडविली खिल्ली, म्हणाला “तू इतका बारीक आहेस की…”
धोनी तो धोनीच !! इंग्लंडला जाण्यापूर्वी ‘या’ खेळाडूने खास फोटो पोस्ट करत काढली माहीची आठवण