पुणे । पुणे महानगरपालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आणि फायर अँड सेक्युरिटीअसोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानेजीवरक्षा आणि सुरक्षितता याकरिता जनजागृतीकरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एफएसएआय लाईफ अर्धमॅराथॉन स्पर्धेत पुण्याच्या शाश्वत शुक्लाने 15 कि.मी अनवाणी जलद धावण्याचा विश्वविक्रम केला आहे. वर्ड बुक ऑफ रेकॅर्डस्(युके) मध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली. शाश्वतने 15 कि.मी हे अंतर अनवणी 58 मिनिटे व 12 सेकंदात पुर्ण केले.
शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे 3 मार्च 2019 रोजी पार पडलेल्या एफएसआय लाईफ मॅरेथॉन 2019 या स्पर्धेत शाश्वतने हा विक्रम रचला. शाश्वत 15 कि.मी जलद अनवाणी धावणारा धावपटू ठरला आहे. 27 वर्षीय शाश्वतने यापुर्वी 54 मिनिटे इतका आपला सर्वोत्तम वेळ नोंदवला आहे. मात्र काही कारणास्तव त्याला आपलाच विक्रम मोडता आला नाही. शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी ते चांदणी चौक 15 कि.मी अंतर शाश्वतने 58 मिनिटे व 12 सेकंदात पुर्ण केले.
मात्र शाश्वतला हे यश खुप खडतर प्रवासानंतर मिळाले आहे. 2007 साली झालेल्या अपघातात शाश्वतच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली. या अपघातानंतर शाश्वतला शारिरीक व मानसीक अशा दोन्ही समस्यांशी झुंज द्यावी लागली. शाश्वतला झालेली दुखापत एवढी जबर होती की कित्येक दिवस त्याला उठता येत नव्हते. स्वतः कपडेही घालता येत नव्हते. डॉक्टरांनी भविष्यात त्याला धावता येणार नाही असे सांगितले.
मात्र शाश्वतने आपला धीर गमावला नाही व 7 वर्षांनंतर 2014 साली पुन्हा अकदा तयारीनिशी तो धावण्यासाठी सज्य झाला मात्र यावेळी त्याने अनवाणी धावण्याचे ठरवीले. त्यासाठी त्याने प्रयत्न करण्यास सुरूवात केली. 2014 नंतर शाश्वत अशा स्पर्धांमधे सहभागी होऊ लागला व त्याला यश मिळू लागले. माजी ऑलंपिक धावपटू राम सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास सुरूवात केली. अनवाणी धावण्याचे स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्याने स्वतःला सिध्द केले.
शाश्वतच्या समस्या एवढ्यावर थांबल्या नाहीत. 2014 मध्ये शाश्वतला डिपोलर डिसऑर्डरची समस्या भेडसाऊ लागली. यामध्ये शाश्वतला पुढचे दोन वर्ष धावण्यापासून दुर रहावे लागले. यादरम्यान शाश्वतला मानसीक समस्यांना तोंड द्यावे लागले. असे असतानाही मिळलेल्या वेळेचा सदउपयोग करत शाश्वतने वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली.
शाश्वत सांगतो त्याचे कुटुंबीय व मित्र त्याच्या धावण्याला पाठिंबा देत नसत, त्याचे आजोबा व मार्गदर्शक प्रशिक्षक राम सिंग यांना शाश्वतवर विश्वास होता. शाश्वतने आजोबा व राम सिंग यांना आपल्या यशाचे श्रेय दिले आहे.
2016 मध्ये शाश्वतने पुन्हा एकदा सराव करण्यास सुरूवात केली. शाश्वत सोमवार ते शनिवार सकाळी 5 वाजता नियमित दोन तास सराव करतो.
तुम्ही शारिरीक व मानसीकरीत्या सक्षम असणे गरजेचे आहे. यातील एक गोष्ट जरी नसेल तर कोणत्याही प्रकारचे यश तुम्ही संपादन करून शकत नाही. असे शाश्वत सांगतो.
2020 नेदरलॅंड येथे होणा-या अनवाणी 100 कि.मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्याचा शाश्वतचा मानस आहे. त्यासाठीची पात्रता फेरी जुलै 2019 मध्ये बेंगलुरू येथे होणार आहे. यासाठी शाश्वत कसून सराव करत आहे. या स्पर्धेमध्ये केवळ 6 धावपटू भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात. अनवाणी 100 कि.मी शर्यतीचा 8 तास 39 असा विश्वविक्रम मोडण्याची ही संधी आहे.