---Advertisement---

धोनीचा हा अफलातून झेल टीम इंडियाच्या आला कामी…

On: मंगळवार, मार्च 5, 2019 7:54 PM
---Advertisement---

नागपूर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 50 षटकात 251 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ऍरॉन फिंच(37) आणि उस्मान ख्वाजाने(38) चांगली सुरुवात केली होती. त्यांनी 83 धावांची सलामी भागीदारी रचली. पण त्यानंतर हे दोघेही एका पाठोपाठच्या षटकात बाद झाले.

हे दोघे बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव शॉन मार्श(16) आणि पिटर हँड्सकॉम्बने सावरण्याचा प्रयत्न केला. पण रविंद्र जडेजाने टाकलेल्या 24 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर यष्टीरक्षक एमएस धोनीने मार्शचा सुरेख झेल घेत ही जोडी तोडली.

यावेळी जडेजाने टाकलेला चेंडू मार्शच्या बॅटची कड घेत धोनीच्या दिशेने गेला. यावेळी यष्टीमागे चपळ असणाऱ्या धोनीनेही कोणती चूक न करता लगेचच झेल घेतला.

https://twitter.com/natinsingh7/status/1102929143358906368

धोनीची यष्टीमागील ही चपळता अनेकदा पहायला मिळाली आहे. जडेजाने टाकलेल्या याच षटकातील पहिल्या चेंडूवरही धोनीने हँड्सकॉम्बला यष्टीचीत करण्याचा प्रयत्न केला होता. पण हँड्सकॉम्बचा पाय क्रिजच्या आत असल्याचे व्हिडिओ रिव्ह्यूमध्ये दिसल्याने त्याला नाबाद देण्यात आले होते.

मार्श बाद झाल्यानंतर काही वेळातच ग्लेन मॅक्सवेलला(4) कुलदीप यादवने त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आवस्था 4 बाद 132 धावा अशी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

जेव्हा एमएस धोनी भरमैदानात चाहत्याला देतो त्रास…, पहा व्हिडिओ

क्रिकेटमधील डक म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या..

२२७ भारतीय क्रिकेटपटूंपैकी असा पराक्रम करणारा विराट चौथाच!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment