मंगळवारी (2 मे) इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आमना सामना झाला. दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उभय संघांतील या सामन्यात पावरप्लेच्या षटकांमध्ये मोहम्मद शमी याने गुजरातला जबरदस्त यश मिळवून दिले.
आयपीएस 2023मधील हा 44वा सामना होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने या सामन्यात आपला एवढ्या वर्षांचा अनुभव दाखवून दिला. शमीने पावरप्लेच्या सहा षटकांपैकी तीन षटके टाकली. या तीन षटका त्याने 7 धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या. गुजरातची धावसंख्या 23 असताना संघाने एकूण 5 विकेट्स गमावल्या. शमीने आपल्या कोटच्या चार षटकांमध्ये एकूण 11 धावा खर्च केल्या आणि चार विकेट्स घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेट अवघा 2.75 होता.
दिल्लीची कर्णधार डेविड वॉर्नर नेहमीप्रमाणे याही सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आला. पण वॉर्नर राशिद खान याने टाकलेल्या नो बॉलवर धावबाद झाला. दरम्यान, चालू आयपीएल हंगामाच्या गुणतालिकेचा विचार केला, तर गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर आहे. मंगळवारी गुजरातसमोब आव्हान असलेला दिल्ली कॅपिटल्स संग मात्र गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजारातने हंगामातील 8 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने हंगामातील सुरुवातीच्या 8 सामन्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. (Half of the Delhi team in the tent in the Powerplay, Mohammed Shami’s blast for Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी मागे हटणार नाही, हे माझ्या रक्तात…’, विराटसमोर सव्वाशेर का बनतोय नवीन? घ्या जाणून
आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्ली गुजरातविरूद्ध मैदानात! नाणेफेक जिंकून कॅपिटल्सचा फलंदाजीचा निर्णय