भारतीय कसोटी संघाचा फलंदाज हनुमा विहारी आजकाल इंग्लंडमध्ये काऊन्टी क्रिकेट खेळत आहे. मवाळ स्वभावाचा विहारी नेहमी शांत डोके ठेवत उत्तर देताना दिसतो. मात्र, जेव्हा पाणी डोक्यावरुन जाते तेव्हा विहारीला ते कसे हाताळायचे हे देखील माहित आहे. ट्विटरवरही अशीच एक घटना नुकतीच पाहायला मिळाली. जेव्हा ट्विटरच्या युजरने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विहारीने त्याला आरसा दाखविण्यात उशीर केला नाही.
विहारीने दिले ट्रोलरला प्रत्युत्तर
विहारी सध्या इंग्लंडमध्ये असला तरी भारतातील घटनांवर त्याचे बारीक लक्ष असते. भारतात कोरोना महामारीने कहर केला असताना तो मदतनिधी गोळा करताना दिसतोय. सोबतच ट्विटरवर लोकांनी मदतीसाठी केलेले ट्विट तो रिट्विट करताना दिसतोय. संपुर्ण जग महामारीशी लढत असताना, काही लोक अजूनही मजा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
विहारीने केलेल्या ट्विटखाली एका वापरकर्त्याने रिप्लाय देत लिहिले, ‘ठीक आहे. दोन मसाला डोसा घेऊन ये आणि सोबत, नारळाची चटणी देखील.’ या वापरकर्त्याच्या खोडसाळपणावर विहारीने तात्काळ प्रतिक्रिया दिली. विहारीने उत्तर देताना लिहिले, ‘मी नक्की दिले असते मात्र तू भारतातील इतर लोकांप्रमाणे आजारी होत आहेस. तुम्ही जरा वेगळ्या आजाराने ग्रस्त आहात. मला माफ करा.’ विहारीच्या या उत्तरानंतर त्या वापरकर्त्याने ट्विट हटविले केले. मात्र, काही चाहत्यांनी त्याचे स्क्रीनशॉट घेतले होते.
इंग्लंड दौऱ्यासाठी झाली आहे निवड
भारताच्या कसोटी संघाचा भाग असलेला हनुमा विहारी सध्या इंग्लंडमध्ये काउंटी खेळत आहे. ज्यामध्ये तो ६ सामन्यात केवळ १०० धावा काढू शकला आहे. मात्र, आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश केला असून त्याच्या येथील अनुभवाचा फायदा संघाला होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ 3 भारतीय खेळाडूंसाठी कसोटी संघाचे दरवाजे झाले कायमचे बंद
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा सनसनाटी आरोप, म्हणाला भारतीय खेळाडू बायोबबलमध्ये
दिल्ली आणि अहमदाबादमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्याचा हट्ट बीसीसीआयला भोवला?