बड्डे गल सायना नेहवालला सरावासाठी करावा लागलायचा दररोज ५० किलोमीटरचा प्रवास!

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा आज ३०वा वाढदिवस आहे. तिने अनेक स्पर्धांमध्ये भारताला पदके मिळवून दिली आहेत. मात्र, इथपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते. मेहनत केल्यानेच फळ मिळते. त्याप्रमाणे सायनानेही इथपर्यंतचा शिखर गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

मुळात हरियाणातली आहे सायना- 

सायनाचे कुटुंब आता हैद्राबादमध्ये स्थायिक आहे. मात्र, ती मुळात हैद्राबादची नाही तर हरियाणाची आहे. १७ मार्च १९९०ला हरियाणातील हिसार या शहरात तिचा जन्म झाला होता. तिचे वडील कृषी विभागात कामाला होते. त्यांचे प्रमोशन झाल्यानंतर त्यांना ५ शहरात बदलीची ऑफर मिळाली होती. तेव्हा त्यांनी हैद्राबादची निवड केली आणि त्यांचे पूर्ण कुटुंब हैद्राबादमध्ये स्थायी झाले.

सरावासाठी दररोज करावा लागायचा ५० किमीचा प्रवास-   

सायना नेहवालने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती ८ वर्षाची असताना तिला बॅडमिंटनच्या सरावासाठी घरापासून दूर २५ किलोमीटरच्या अंतरावर जावे लागायचे. यामुळे ती दररोज सकाळी ४ वाजता उठत होती. तिचे वडिल दररोज तिला स्कुटरवर सोडायला जायचे आणि २ तास स्टेडियममध्ये थांबून तिला खेळताना पाहायचे. मग, तिथून त्यांची स्वारी शाळेला निघायची.

सकाळी लवकर उठल्यामुळे कधी-कधी तिला झोपही यायची. अशावेळी ती पडेल म्हणून तिची आईही वडिलांसोबत तिला सोडायला जायची. रोज ५० किलोमीटरचा प्रवास करणे सोपे नव्हते, मात्र कित्येक महिने माझ्यासह माझ्या परिवारालाही असा प्रवास करावा लागला.

बॅडमिंटन नव्हते खेळायचे सायनाला-

लहानपणी सायनाचे पहिले प्रेम बॅडमिंटन नाही तर कराटे होते. कराटेमध्ये तिला ब्लॅक बेल्टही मिळाला होता. सायनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या वडिलांची हरियाणाहून हैद्राबादला बदली होण्यापुर्वीच तिने कराटे खेळायला सुरुवात केली होती. तिला सुरुवातील कराटे स्पर्धांमध्ये यशही मिळाले होते, मात्र प्रंचड मेहनतीनंतरही ती कराटेसाठी स्वत:ला फिट बनवू शकली नाही. म्हणून मजबुरीने तिला कराटे सोडावे लागले.

मग का सायनाने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली-

कराटे सोडल्यानंतर सायनाने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिच्या आई-वडिलांना बॅडमिंटन खूप आवडते म्हणून ती या क्षेत्राकडे वळली.

शाहरुख खानची चाहती आहे सायना-

कितीही व्यस्त असली तरी सायना शुक्रवारी हॉलिवूड किंवा बॉलिवूडचा एक तरी सिनेमा पाहते. विशेष म्हणजे सायनाला शाहरूख खान खूप आवडतो. सायना जरी आता बॅडमिंटन स्टार असली तरी लहानपणी तिला क्रिकेट खेळायलाही खूप आवडायचे. एका मुलाखतीत सायनाची मोठी बहीण चंद्रांशुने सांगितले होते की, सायना कधी कधी अभ्यास सोडून क्रिकेट खेळायला जात होती.

२००६मध्ये चर्चेत आली होती सायना-

साल २००६मध्ये सायना पहिल्यांदाच खूप चर्चेत आली होती. कारण, १६ वर्षीय सायनाने त्यावेळेला  १९ वर्षांखालील राष्ट्रीय चषक जिंकले होते. याव्यतिरिक्त तिने २ वेळा आशियाई सॅटेलाईट चषक जिंकून इतिहास रचला होता. याचवर्षी ती वांग यिहान याच्या हातून ज्यूनिअर विश्वचषकाच्या अंतिम फेरित पराभूत झाली होती आणि दुसऱ्या क्रमांकावर होती.

ट्रेडिंग घडामोडी-

टी20 क्रिकेट विश्वचषकाच्या आयोजनाबद्दलची सर्वात मोठी बातमी

 जर आयपीएल रद्द झाली तर विराट-रोहितचे किती होणार नुकसान

 आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…

राजस्थान रॉयल्सला बसला मोठा धक्का; गोलंदाजाचा झाला भीषण अपघात

 आयपीएलचे आयोजन होणार एकाच शहरात?

You might also like