क्रिकेट विश्वात जेव्हा जुळ्या भावाचं नाव घेतलं जातं, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ‘वॉ’ भावांचं नाव सर्वात अगोदर येतं. स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ यांनी काल 2 जूनला आपला 55 वा वाढदिवस साजरा केला. दोन्ही भाऊ ऑस्ट्रेलियासाठी जवळपास दहा वर्षे खेळले आहेत, तर दोघांनी मिळून 35025 धावा केल्या आहेत. स्टीव्ह आणि मार्क यांचा जन्म 2 जूनला न्यू साऊथ वेल्स कॅन्टरबरीमध्ये झाला होता.
स्टीव्ह (Steve Waugh) यांना कायम महान कर्णधार मानलं जातं. मार्कने (Mark Waugh) स्टीव्ह नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होतं. स्टीव्हने 1985 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं होतं. एका वर्षानंतर त्यांना वनडे संघातही स्थान मिळाले.
स्टीव्ह त्यावेळी चांगल्या लयीत आले होते. त्यांनी 1987 विश्वचषकामध्ये शेवटच्या षटकांमध्ये कसून गोलंदाजी करून ‘आईसमॅन टॅग’ काढून टाकला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवून विश्वचषक जिंकला होता.
मार्कने 1991 मध्ये कसोटी पदार्पण केले. 1991 ऍशेस मालिकेतील खराब प्रदर्शनामुळे स्टीव्ह ला संघातून बाहेर बसवण्यात आलं आणि त्याच्या जागी मार्कला अंतिम 11 मध्ये निवडण्यात आले. मार्कने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच इंग्लंड विरुद्ध शतक ठोकलं होतं. तस मार्कने 1988 मध्येच वनडे क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते.
वॉ भावांनी 1991 मध्ये वेस्टइंडीजमध्ये एक कसोटी सामना बरोबर खेळला होता. त्यामुळे कसोटी सामना खेळणाऱ्यांमध्ये या जुळ्या भावांची पहिली जोडी बनली. त्यानंतर या दोन्ही भावांनी मैदानावर कहर माजवला होता.
या भावांनी 1994-95 मध्ये शतकीय भागीदारीच्या दमावर वेस्ट इंडीजला चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पराभूत करून अविस्मरणीय मालिका जिंकली. त्या सामन्यात स्टीव्हने 200 तर मार्कने 126 धावा काढल्या होत्या.
स्टीव्हने 168 कसोटी सामन्यात 10927 आणि 325 वनडेत 7569 धावा काढल्या आहेत. तसेच मार्कने 128 कसोटीत 8029, तर 244 वनडेत 8500 धावा केल्या आहेत.
मार्कची कारकीर्द स्टीव्ह अगोदर संपली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मार्कने 2002 मध्ये तर स्टीव्हने 2004 मध्ये निवृत्ती घेतली.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ब्रेकिंग: इंग्लंड दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाची घोषणा
-मजदूरांना अन्न पुरवण्यासाठी या भारतीय गोलंदाजांने लावला घराबाहेर स्टॉल
-वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात ज्यो रुट होवू शकतो संघाबाहेर, कारण…