भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळचा अध्यक्ष सौरभ गांगुलीचा गुरुवारी 49 वा वाढदिवस साजरा झाला. गांगुलीने आपला वाढदिवस आपल्या कोलकाता येथील घरी केक कापून साजरा केला. विशेष म्हणजे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील संध्याकाळी गांगुलीच्या घरी जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या.
ममता बॅनर्जी यांनी गांगुलीला फुलांचा गुच्छ आणि केक भेट म्हणून देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ममता बॅनर्जी आणि सौरव गांगुलीमध्ये थोडावेळ चर्चा देखील झाली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौरव गांगुलीने ममता बॅनर्जी यांना साडी भेट म्हणून दिली.
https://twitter.com/sri50/status/1413115111066112007
प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सौरभ गांगुलीने सांगितले होते की, तो आपला वाढदिवस घरीच साजरा करणार आहे. काही दिवसांपूर्वीच सौरव गांगुलीला हृदयातील काही समस्यांमुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर आपल्या तब्येतीबद्दल खुलासा करत गांगुली म्हणाला की, आता तो पूर्णपणे बरा आणि तंदुरुस्त आहे. गांगुलीने अगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या. त्याच बरोबर कोरोना परिस्थितीमुळे टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतमध्ये करता न आल्याबद्दलही गांगुलीने दिलगिरी व्यक्त केली.
https://twitter.com/rudrosray/status/1413119648497733639
याविशेष प्रसंगी अनेक चाहत्यांसह गांगुलीच्या माजी सहकारी क्रिकेटपटूंनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही गांगुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकरने लिहिले की, “माझ्या प्रिय दादा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पुढील सर्व वर्ष निरोगी आणि मंगलमय जावे.”
गांगुली हा भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्याच नेतृत्वाखाली विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, एमएस धोनी अशा अनेक खेळाडूंनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. फिक्सिंग सारख्या संकटाचा भारतीय संघ सामना करत असताना गांगुलीने भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत संघाना यशाच्या नव्या शिखरापर्यंत पोहचवण्यात त्याचा मोठा वाटा होता. गांगुलीने आज खेळाडू ते बीसीसीआयचा अध्यक्ष एवढा मोठा प्रवास केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीने निवडला आपला सर्वकालीन संघ, ‘या’ दोन भारतीयांना दिले स्थान, तर पॉन्टिंगला केले कर्णधार
मोठी बातमी! टोकियो ऑलिंपिकविषयी मोठा निर्णय, प्रेक्षक मुकणार जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला






