मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सध्या काहीही ठीक चाललेलं नाही. आधी फ्रॅच्यायझीनं रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं, ज्यामुळे चाहते अत्यंत नाराज झाले. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही संघाचा पराभव झाला. सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मामध्येही सर्वकाही ठीक नसल्याचं जाणवलं. हार्दिकनं रोहितला क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेवर पाठवलं, तर मॅच हारल्यानंतर रोहित हार्दिकला फटकारताना दिसला.
या सर्व घडामोडींमध्ये आता एक आनंदाची बातमी आहे, जी पाहून रोहित शर्माचे चाहते नक्कीच खूष होतील. चाहत्यांचा लाडका रोहित शर्मा आज रंगपंचमीच्या दिवशी मस्त रंगांसोबत खेळताना दिसला. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून रोहितचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर रोहित शर्माचा रंगासोबत खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला, जो अवघ्या काही क्षणातच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये रोहित रंगपंचमी एन्जॉय करताना दिसतोय. तो पाण्यासोबत होळी खेळत असून त्याचा संपूर्ण चेहरा रंगानं माखलेला आहे. रोहित पाण्याचा पाईप हातात घेऊन कॅमेऱ्यावर फव्वारा मारतो. व्हिडिओमध्ये रोहितनं रंगांचा हा उत्सव चांगलाच एन्जॉय केल्याचं दिसतंय. रोहितचा हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच सुखद धक्का बसेल.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सचा रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय चाहत्यांना आवडलेला नाही. चाहते आधी सोशल मीडियावर व्यक्त झाले. त्यानंतर, रविवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानावरही हार्दिक पांड्याच्या विरोधात चाहत्यांचा राग पाहायला मिळाला. नाणेफेकीच्या वेळी हार्दिकला बूइंग करण्यात आलं. तसेच जेव्हा-जेव्हा हार्दिककडे चेंडू आला किंवा तो गोलंदाजीला आला तेव्हा चाहत्यांनी हूटिंग करायला सुरुवात केली.
गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील पहिला सामना 24 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरातनं प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 162 धावाच करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-