आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी दोन वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. आता त्यात लवकरच आणखी एक नाव जोडले जाऊ शकते, ते म्हणजे समी अस्लम. त्याने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळणे सोडले आहे. तसेच नुकतेच त्याने काही खुलासेही केले आहेत. आता त्याने अमेरिकेकडून खेळण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचे सांगितले आहे.
२५ वर्षीय अस्लमने पाकिस्तान संघाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याच्या कारणाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याबद्दल कोणताही पश्चाताप होत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
त्याने पाक पॅशनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की ‘अमेरिकेमध्ये ३ वर्षांचा कालावधी घालवावा लागतो. इथे क्रिकेट खेळण्यासाठीची पात्रता मी २०२३ ला मी मिळवेल. मला याबद्दल १ टक्कासुद्धा पश्चाताप होत नाही. पाकिस्तानमध्ये २ वर्ष निराशेत घालवल्यानंतर मी आता खूष आहे.’
तो पुढे म्हणाला, ‘ज्याप्रकारे पाकिस्तानमध्ये प्रशिक्षक माझ्याशी वागायचे त्यावेळी खूपच वाईट परिस्थिती होती. संघातून बाहेर झाल्यानंतर मी अनेक प्रश्न विचारले की माझी निवड का झाली नाही, मला अशी वागणूक का दिली जात आहे, पण कोणीही उत्तर दिले नाही आणि कोणीही कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. ते दुसऱ्यांनाच दोष देत होते.’
Sami Aslam "There's a 3-year eligibility & I will qualify to play for America in November 2023. I've not even 1% regret. I am really happy after being depressed in Pakistan for 2 years. I was in a bad place due to coaches & events in Pakistan & the way they treated me" #Cricket
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) May 8, 2021
पाकिस्तानकडून २०१५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाला अस्लम पुढे म्हणाला, ‘मी सातत्याने चांगले प्रदर्शन केले, पण तरीही माझी संघात परत निवड झाली नाही. जोपर्यंत तुम्ही पक्षपात संपवत नाहीत, तोपर्यंत चांगले क्रिकेटपटू तयार होऊ शकत नाहीत.’
तसेच तो असेही म्हणाला, ‘मला पाकिस्तानमधून १०० पेक्षाही अधिक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे फोन येतात. ते सुद्धा अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याची वाट पाहात आहेत. इतकेच नाही तर सध्या पाकिस्तानमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही इथे येण्याची इच्छा आहे.’
अस्लमने पाकिस्तानकडून १३ कसोटी सामने आणि ४ वनडे सामने खेळले आहेत. त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये ७ अर्धशतकांसह ३१,५८ च्या सरासरीने ७५८ धावा केल्या आहेत. तसेच ४ वनडेत ७८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय फुटबॉल विश्वावर शोककळा! एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या दिग्गज फुटबॉलपटूचे निधन
जेव्हा स्म्रीती मंधना बनवते अंडा-भूर्जी आणि संघसहकारी घेतात तिची फिरकी, पाहा व्हिडिओ
बाबर आझमचा ऐतिहासिक कारनामा! ठरला ‘असे’ करणारा पाहिलाच पाकिस्तानी कर्णधार