भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपुर्वी मोठे व्यक्तव्य करत विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत प्रतिक्रीया दिली होती. रवी शास्त्री म्हणाले होते की मला वाटते की, कोहली अजुन काही वर्ष कर्णधारपद सांभाळू शकला असता. पण तसे केले असते तर लोकांना त्याचे यश बघवले नसते. रवी शास्त्रींच्या या वक्तव्यामुळे बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यातील मतभेदाची पुष्टी झाली होती. त्याची सुरुवात डिसेंबरमध्ये झाली होती जेव्हा कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आले होते.
रवी शास्त्रींच्या या वक्तव्यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने प्रतिक्रीया दिली आहे. भज्जी म्हणाला की, “रवी शास्त्रींनी कोणत्या बाबतीत हे मत दिले आहे मला माहित नाही. मात्र, कोहलाने भारतीय कसोटी कर्णधार म्हणून जे यश मिळवले आहे. त्यामुळे त्याला आणि मोठ्या संख्येने भारतीय चाहत्यांना आनंद आणि अभिमान वाटला आहे”.
हरभजन सिंगने सांगितले की, “हे मोठे विधान आहे. रवी शास्त्री म्हणाले की जर विराट कोहलीने पुढील १५-२० कसोटी सामने जिंकले असते तर लोकांना ते पचले नसते. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून नाव झाले असते. मला नाही माहित की ते कोणाबद्दल बोलत होते. पण आम्हा भारतीयांना त्याच्यावर खुप गर्व आहे. त्याने आणखीन ४० सामने जिंकावेत आणि असे विक्रम करावेत की कोणताही भारतीय कर्णधाराला त्याची बरोबरी करण्यासाठी दोनदा कर्णधार होण्याची गरज भासेल असे आम्हाला वाटते.”
शास्त्री म्हणाले होते की, “भारताला पुढील काही वर्षांत जास्तीत जास्त कसोटी मालिका स्वदेशात खेळायच्या आहेत. जर विराट कोहली कर्णधारपदाचे नेतृत्व करत असता तर, त्याचा शानदार विक्रम अजून मजबुत झाला असता.” भारतीय संघाने घरच्या मैदानावर (भारतात) ३१ कसोटी सामने खेळले असुन, त्यापैकी फक्त २ सामने भारताला गमवावे लागले आहेत.
हरभजन सिंग पुढे म्हणाला की, “गेल्या दोन-तीन वर्षांतील भारतीय फलंदाजांची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की, त्यांना धावा कशा करायच्या हेच कळत नाही. धावा कशा करायच्या हे आपलले फलंदाज विसरले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत फलंदाजांना फार धावा करता न आल्याने त्यांच्यात आत्मविश्वास कमी होता. जेव्हा धावा होत नाहीत तेव्हा खेळाडू दडपणाखाली येतात. घरच्या मैदानावर तुम्ही मालिका जिंकत असता, पण तिथे तुमच्या खेळाडूंची प्रगती होत नाही.”
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघातील ३ न्यू कमर्स, ज्यांना मिळू शकते वनडे पदार्पण करण्याची संधी (mahasports.in)





