---Advertisement---

विराटने ती गोष्ट करावी, जी धोनी नेतृत्व करताना करायचा, हरजभजन सिंगचा सल्ला

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 7:25 PM
Virat Kohli and MS Dhoni.jpg
---Advertisement---

टी-२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये रविवारी (३१ ऑक्टोबर) आमना सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री ७.३० वाजता आयोजित केला गेला आहे. या सामन्यापूर्वी भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने कर्णधार विराट कोहलीला काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. हरभजनने संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये दोन महत्वाचे बदल सुचवले आहेत. तसेच त्याने विराटला एमएस धोनीप्रमाणे नेतृत्व करायला सांगितले आहे.

हरभजनने धोनी त्याच्या नेतृत्वात काय करायचा, हे स्पष्ट केले आहे आणि विराटनेही तसेच करावे असे सांगितले आहे. हरभजन यावेळी त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. यावेळी त्याने कर्णधार विराट कोहलीला महत्वाचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, विराट कोहलीही सामन्यादरम्यान ते करू शकतो, जे एमएस धोनी नेतृत्व करताना करायचा. गरजेचे नाही की, ठरलेल्या फिल्डिंग पोजिशनवरतीच खेळाडूंना ठेवले जावे. ज्याठिकाणी चेंडू जात आहे, त्याहिशोबाने खेळाडूंना लावले जावे.

टी२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानने १० विकेट्स राखून पराभूत केले होते. या सामन्यात भारतील गोलंदाजांना एकही विकेट घेता आला नव्हता. तसेच फलंदाजही काही खास कामगिरी करू शकले नव्हते. आता न्यूझीलंविरुद्ध सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले जाण्याच्या अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर हरभजन संघनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्वाचे बदल सुचवले आहेत. हरभजन म्हणाला की, शार्दुल ठाकुर आणि ईशान किशन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले पाहिजे.

हरभजन पुढे बोलताना म्हणाला की, भारतीय संघ नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करू इच्छित असेल, पण जर नाणेफेक हारले, तरी काही अडचण नाही होणार. भारतीय संघाकडे चांगली गोलंदाजी लाइन-अप आहे, फक्त संघाला १७०-८० धावांचे लक्ष्य सेट करावे लागेल.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाकडून पराभव मिळाला आहे. उपांत्य सामन्यात जागा मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. दुसरीकडे पाकिस्ताने विश्वचषकातील त्यांचे पहिले तीन सामने जिंकले आहेत आणि उपांत्य सामन्यातील त्यांचे स्थान जवळपास पक्के केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंडविरुद्ध ‘हे’ पाच भारतीय खेळाडू ठरू शकतात विजयाचे शिल्पकार

Video: पत्रकारांवर भडकला अफगाणिस्तानचा कर्णधार; म्हणाला, ‘क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारा’

“भुवनेश्वर एक अनुभवी गोलंदाज, पण मला त्याच्याऐवजी शार्दुलला निवडेल”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---