---Advertisement---

ASIA CUP: ‘उमरान-दिपक संघाबाहेर अन् कार्तिकला संधी न मिळणे सगळं निराशाजनक!’ माजी दिग्गजाने साधलाय निशाणा

On: बुधवार, सप्टेंबर 7, 2022 12:34 PM
Deepak-Chahar-Dinesh-Karthik-Umran-Malik
---Advertisement---

मंगळवारी (6 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका सुपर 4 सामन्याची लढत झाली. या लढतीत श्रीलंकेने भारताचा दारून पराभव केला. या पराभवानंतर भारतभरातून टीम इंडियाच्या खेळाडूंवर निशाणा साधला जात आहे.अशातच भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने ट्वीट करत भारताच्या निवडसमितीवर निशाणा साधला आहे.

हरभजनने ट्वीट मध्ये ‘150च्या गतीने गोलंदाजी करणारा उमरान, विशेष स्विंग गोलंदाजदीपक चाहर संघात का दिसले नाहीत, शिवाय दिनेश कार्तिकला सातत्याने संधी का मिळाली नाही? हे सगळं निराशाजनक आहे.’ असे ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आशिया चषकाचा संघ जाहिर झाल्यापासूनच अनेकांनी भारतीय निवडसमितीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली होती. आता भारताचा आशिया चषक जवळपास संपुष्टात आल्यानंतर या चर्चांना पुन्हा उधाणं आले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचा एक विजय भारत-अफगाणिस्तानला करेल बाहेर, PAKvsAFG सामन्याबद्दल वाचा सर्वकाही
भारत आता अफगाणिस्तान भरोसे, नबी अन् संघाला पाकिस्तानविरुद्ध करावं लागेल ‘हे’ काम
कर्णधार रोहितच्या ‘या’ निर्णयामुळे हारली इंडिया! पाकिस्तानचा घाम फोडणाऱ्या गोलंदाजालाच केले बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---