---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याला क्रिकेटर घाबरतात तो खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यवर बाद

---Advertisement---

आयपीएल म्हटले की सर्वांना पहिल्यांदा आठवते ती गोष्ट म्हणजे चौकार, षटकारांची आतिषबाजी. आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाज विविध विक्रम करत असतात. पण यामध्ये असाही एक नकोसा विक्रम आहे जो हरभजन सिंगच्या नावावर आहे.

आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा शून्य धावेवर बाद होण्याच्या यादीत हरभजन सिंग अव्वल क्रमांकावर आहे. तो आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 149 सामन्यात खेळला असून यात तो 13 वेळा शून्य धावेवर बाद झाला आहे.

पण याबरोबरच त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 800 धावाही केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. हरभजन 2017 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळला. त्यानंतर त्याला मागीलवर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाने लिलावात संघात सामील करुन घेतले आहे.

हरभजन पाठोपाठ आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बाद होण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पियूष चावला, मनिष पांडे, पार्थिव पटेल, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा असे पाच खेळाडू आहेत.  हे पाचही खेळाडू आयपीएलमध्ये आत्तापर्यंत प्रत्येकी 12 वेळा शून्य धावेवर बाद झाले आहेत.

तसेच तिसऱ्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू आणि अमित मिश्रा आहेत. हे तिघेही आयपीएलमध्ये प्रत्येकी 10 वेळा भोपळाही न फोडता बाद झाले आहेत.

यावर्षीच्या आयपीएलला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर(चेपॉक) होणार आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्य धावेवर बाद होणारे क्रिकेटपटू-

13 – हरभजन सिंग

12 – पियूष चावला

12 – मनिष पांडे

12 – पार्थिव पटेल

12- गौतम गंभीर

12 – रोहित शर्मा

10 – अमित शर्मा

10 – अजिंक्य रहाणे

10 अंबाती रायडू

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूने केलेला तो विक्रम आजही कोणत्याच खेळाडूला मोडता आला नाही

आयपीएलमध्ये गेल्या ११ वर्षात सुरेश रैनाने जे केले ते यावर्षीही करणार का?

आयपीएल इतिहासातील हे ३ आहेत सर्वात फ्लाॅप कर्णधार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment