भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) न्यूयॉर्क विमानतळावर नवज्योत सिंग सिद्धूची (Navjot Singh Sidhu) मिमिक्री करताना दिसला. हरभजननं नवज्योत सिंग सिद्धूची मिमिक्री करत सर्वांना हसवलं. हरभजनचा हा व्हिडिओ भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकजणांनी खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेला व्हिडिओ न्यूयॉर्क विमानतळावरचा आहे. व्हिडीओमध्ये हरभजन सिंगसोबत नवज्योत सिंग सिद्धू आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम देखील दिसत आहे. जे या क्षणाचा आनंद घेत आहेत. भज्जीनं सिद्धूच्या स्टाईलमध्ये संवाद केला की स्वतः नवज्योत सिंग सिद्धूदेखील स्वत:ला हसण्यापासून रोखू शकले नाहीत. हरभजन म्हणाला, “पक्ष्याचा एक पंख कापला तर तो उडू शकत नाही. जर पाऊस थांबला नाही तर याचा अर्थ असा नाही की आम्ही जाणार नाही. सिद्धू जहाज उडवणार”
View this post on Instagram
नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यंदाच्या टी20 विश्वचषकात जवळजवळ 10 वर्षांनंतर काॅमेंट्री करत आहेत. त्यांच्या काॅमेंट्रीचा अनेक प्रेक्षक आनंद घेत असतात. तत्पूर्वी यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघानं विजयाची हॅट्रिक लगावली आणि सुपर 8 मध्ये त्यांची जागा पक्की केली. सुपर 8 मध्ये भारताची टक्कर अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया या संघांशी पक्की झाली आहे.
भारतीय संघ सुपर 8चे 3 सामने वेस्ट इंडिज मध्ये खेळणार आहे. भारत साखळीफेरीचा अखेरचा सामना (15 जून) रोजी कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. बीसीसीआयनं भारतीय संघाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघ न्यूयाॅर्कमधून फ्लोरिडाला जाण्यासाठी सज्ज दिसत होता. भारतीय संघानं न्यूयाॅर्कमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका या संघांना धूळ चारली आणि सुपर 8 साठी जागा निश्चित केली.
महत्त्वाच्या बातम्या-
अजय जडेजा मोठ्या मनाचा खेळाडू, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सीईओनं केलं गुपित उघड
या 3 कारणांमुळे पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला
“कुर्बानी के जानवर हाजिर हो”, बाबर आझमवर भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; सोशल मीडियावर काढला राग