राजकीयदृष्ट्या भारतातील एक प्रमुख राज्य असलेल्या पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने सर्व पक्ष काही प्रसिद्ध व्यक्तींना आपल्या पक्षात सामील करू इच्छित असतात. आता याच पार्श्वभूमीवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) हा काँग्रेस पक्षात सामील होणार असल्याचे, संकेत मिळत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू व पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी ट्विट केलेल्या एका छायाचित्रामुळे ही चर्चा जोरात सुरू आहे. (Harbhajan Singh In Politics)
काय केले ट्विट
आपल्या वक्तव्यामुळे तसेच बोलण्याच्या एका खास शैलीमुळे प्रसिद्ध असलेले सिद्धू हे सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमध्ये कायम चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी हरभजनसिंग सोबतचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले. त्यांनी या पोस्टला कॅप्शन देताना लिहिले,
‘शक्यतांनी भरपूर असलेले छायाचित्र. चमकता सितारा हरभजन सिंग यांच्यासोबत’
Picture loaded with possibilities …. With Bhajji the shining star pic.twitter.com/5TWhPzFpNl
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) December 15, 2021
या भेटीमुळे अनेकांनी हरभजन लवकरच राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत. कारण, सिद्धू हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांच्याकडे पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद देखील आहे.
मागील आठवड्यात आली होती दुसरी बातमी
काही दिवसांपूर्वी हरभजनसिंग याच्यासह भारताचा दुसरा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, दोघांनीही या मुद्द्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याने या दोन मातब्बर खेळाडूंना आपल्या पक्षात सामील करून घेण्यासाठी सर्व पक्ष इच्छुक असतील.
अद्यापही निवृत्त झाला नाही हरभजन
हरभजन सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला नाही. तो अजूनही आयपीएलमध्ये खेळताना दिसत असतो. मात्र, २०१६ पासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी तो निवृत्ती स्वीकारून आयपीएलमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. (Cricketers In Politics)
महत्त्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: हरियाणा स्टीलर्सने ‘या’ स्टार रेडरला बनवले कर्णधार, पाहा त्याची आकडेवारी