ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू एँड्र्यू सायमंड्स याचे शनिवारी (दि. १४ मे) कार अपघातात निधन झाले. त्याच्या निधनामुळे क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक आजी-माजी दिग्गज खेळाडू सायमंड्सच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने सायमंड्सच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सायमंड्सला श्रद्धांजली वाहिली आहे. (Harbhajan Singh Tweeted On Andrew Symonds Death)
आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाला हरभजन सिंग?
हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने एँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याच्या निधनावर ट्वीट करत लिहिले की, “एँड्र्यू सायमंड्स याच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. खूप लवकर गेला. कुटुंब आणि मित्रांबद्दल मनःपूर्वक संवेदना. दिवंगत सायमंड्सच्या आत्म्यासाठी प्रार्थना.”
Shocked to hear about the sudden demise of Andrew Symonds. Gone too soon. Heartfelt condolences to the family and friends. Prayers for the departed soul 🙏#RIPSymonds
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 15, 2022
हरभजन सिंग आणि एँड्र्यू सायमंड्सचा वाद
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचीही कारकिर्द ही वादग्रस्त घटनांमुळे संपुष्टात आली. त्याने १९९८ ते २००९ या कालावधीत २६ कसोटी, १९८ वनडे आणि १४ टी२० सामने खेळले. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता होती. तसेच तो महत्त्वाच्या वेळी विकेट्सही काढायचा.
पण २००८ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याच्यात आणि हरभजन सिंगमध्ये वादावादी झाली. त्यावेळी सायंमड्सने हरभजनवर त्याला मंकी म्हटल्याचा आरोप केला होता. त्या दोघांमधील मंकीगेट प्रकरण चिघळले होते.
हेही पाहा- धडाकेबाज क्रिकेटपटू तरीही दारूडा म्हणून ओळखला जाणारा ऍण्ड्रू सायमंड्स
त्यावेळी हरभजनवर ३ सामन्यांच्या बंदीचाही निर्णय घेण्यात आला पण बीसीसीआयच्या मदतीने भारतीय खेळाडूंनी या विरोधात नाराजी व्यक्त केल्याने ही बंदी काढण्यात आली. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने योग्य साथ न दिल्याचे सायमंड्सला वाटले.
त्याने ऑगस्ट २००८ ला संघाच्या बैैठकीसाठी न जाता मासेमारीसाठी गेला. ज्यामुळे त्याच्यावर काही महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली. त्यानंतर २००९ ला सुरुवातीला एका मुलाखतीदरम्यान त्याने न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्यूलमबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यामुळे त्याच्यावर ऑस्ट्रेलियाने दंड ठोठावला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
एवढेच नाही तर २००९ च्या टी२० विश्वचषकादरम्यानही त्याच्याबाबतीत दारुच्या संदर्भात काहीतरी वाद झाले. त्यामुळे त्याला पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले. यानंतर काही दिवसातच त्याने निवृत्ती घेतली. २००८-०९ दरम्यान त्याच्याबाबतीत घडलेल्या या वादग्रस्त घटनामुळे कारकिर्दीलाही पूर्णविराम लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ऑस्ट्रेलियाच्या महान अष्टपैलू क्रिकेटरचा कार अपघातात मृत्यू, क्रिकेटविश्वावर शोककळा
टीम इंडियाबरोबर झालेल्या ‘त्या’ वादामुळे दारुडा झाल्याचे सायमंडने केले होते आरोप
दारु पिणे किती महागात पडू शकते, याची ५ क्रिकेटमधील उदाहरणे