जागतिक सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) सुरू होण्यासाटी काही दिवस उरले आहेत. 2017 नंतर ही मेगा स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होत आहे. यंदा या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. ज्याची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. पण भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव आपले सर्व सामने हायब्रीड माॅडेल अंतर्गत दुबईमध्ये खेळणार आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण हे जाणून घेऊया की, कोणत्या 3 भारतीय गोलंदाजांनी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा दिल्या आहेत.
1) उमेश यादव- 75 धावा विरूद्ध दक्षिण आफ्रिका (2013)- दीर्घकाळ भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) सध्या पुन्हा संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. 2013 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली. पण या स्पर्धेत त्याची दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वाईट गोलंदाजी झाली. कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 10 षटकात 75 धावा दिल्या. दरम्यान त्याने 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या.
2) हरभजन सिंग- पाकिस्तानविरूद्ध 71 धावा (2009)- भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगसाठीही (Harbhajan Singh) चॅम्पियन्स ट्रॉफी खूप चांगली राहिली आहे. पण 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सेंच्युरियनमध्ये झालेल्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने 10 षटकांत 71 धावा देत 1 विकेट घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघाची ही दुसरी सर्वात महागडी गोलंदाजी कामगिरी आहे.
3) रविचंद्रन अश्विन – 70 धावा विरूद्ध पाकिस्तान (2017)- भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) अलिकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अश्विनने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात, 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात अश्विनचा रेकॉर्ड खराब होता. ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने 10 षटकात 70 धावा दिल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
जोस बटलरचा भीमपराक्रम…! भारताविरूद्ध अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज
‘या’ स्टार खेळाडूने जिंकला ‘आयसीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार..!
कोणत्या भारतीय फलंदाजाने प्रजासत्ताकदिनी झळकावले होते शतक?