भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज हरभजन सिंगने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. या २३ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच त्याच्या आयुष्यात अनेक असे अविस्मरणीय क्षण आले आहेत. तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. तसेच २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. आता निवृत्ती झाल्यानंतर त्याने क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात आठवणीतला क्षण कुठला याचा खुलासा केला आहे.
हे तीनही क्षण हरभजन सिंगच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत. त्याने कोलकाताच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हॅटट्रिक घेतली होती. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या या मालिकेत हरभजन सिंगने ३२ गडी बाद केले होते. त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला पराभूत केले होते. तसेच २०११ मध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत देखील भारतीय संघाने विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये हरभजन सिंगने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.(Harbhajan Singh revealed his best moment of his life)
हा आहे सर्वात खास क्षण
हरभजन सिंगने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “प्रत्येक क्रिकेटपटूला एका अशा कामगिरीची गरज असते, ज्यानंतर लोक त्याला पाठिंबा देतात आणि त्याच्या खेळाकडे गांभीर्याने लक्ष देतात. २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेली मालिका माझा तोच क्षण होता. त्यावेळी मी जर अव्वल क्रमांकाच्या संघाविरुद्ध हॅटट्रिक आणि ३२ गडी बाद केले नसते तर, लोकांनी मला ओळखले नसते. तो क्षण माझ्या अस्तित्वाशी निगडीत आहे. एक-दोन मालिकांनंतर मी गायब होणार नाही, हे सिद्ध झाले. मी या जागेचा हक्कदार आहे हे सिद्ध झालेले.”
तसेच तो पुढे म्हणाला, “२००० साली मॅच फिक्सिंग प्रकरण झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संकटात होते. लोकांचा क्रिकेटवरून विश्वास उडाला होता. त्यांना पुन्हा स्टेडियममध्ये बोलवण्यासाठी माझ्या ३२ गडी बाद करण्याची आणि वीवीएस लक्ष्मणच्या २८१ धावांच्या खेळीची गरज होती. ते जादुई होते.”
महत्वाच्या बातम्या :
जिंकायचं असल्यास शमी, बुमराहसह ‘या’ वेगवान गोलंदाजाला करा संघात सामील, नेहराचा कामाचा सल्ला
हे नक्की पाहा :