सलग दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स संघाला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी (29 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा 9 धावांनी नजीकचा पराभव केला. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार बदलण्यात यावा अशी थेट मागणी भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने केली आहे.
एक वेळ सामन्यात आघाडीवर असलेल्या दिल्लीला पराभव पत्करावा लागल्यानंतर समालोचन करत असलेला हरभजन सिंग म्हणाला,
“दिल्लीला आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. डेव्हिड वॉर्नर याला नेतृत्वावरून हटवून अष्टपैलू अक्षर पटेल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात यावी. खेळाच्या तीन विभागात योगदान देणारा तसेच फॉर्ममध्ये असलेला खेळाडू कर्णधार असणे ठरेल फायदेशीर ठरेल.”
अक्षर याने या संपूर्ण हंगामात फलंदाजी व गोलंदाजीत कमालीचे सातत्य दाखवले असून, तो संघाचा उपकर्णधार देखील आहे. नियमित कर्णधार रिषभ पंत जायबंदी असल्याने वॉर्नर याला या हंगामात नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. दिल्लीला आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. आणखी एक पराभव स्वीकारल्यास त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की येईल.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार एडेन मार्करम याने घेतलेला हा निर्णय हैदराबादच्या खेळाडूंना योग्य असल्याचे सिद्ध केले. यावेळी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 197 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला 6 विकेट्स गमावत 188 धावाच करता आल्या. अपयश आले. त्यामुळे हा सामना हैदराबादने 9 धावांनी जिंकला
(Harbhajan Singh Said Now Axar Patel Will Lead Delhi Capitals In IPL 2023 Reminder)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान सुधरणार नाही! लाईव्ह सामन्यात घडली मोठी चूक, अंपायर्सनी लगेच थांबवली मॅच; पाहा व्हिडिओ
मोहम्मद शमीने मोडलं KKRचं कंबरडं, IPL 2023मध्ये केली अनोखी ‘शंभरी’, सिराजनंतर बनला दुसराच गोलंदाज