सोशल मीडियावर बऱ्याचसा व्हिडिओंना लोकप्रियता मिळत असते. यामध्ये क्रिकेटविश्वातील व्हिडिओही असतात. क्रिकेटविश्वातील जे व्हिडिओ व्हायरल होतात, यामध्ये काहीमध्ये खेळाडूंचे चांगले प्रदर्शन दिसते; तर काहींमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणाजोग्या मजेदार घटना घडलेल्या दिसतात. असाच एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे.
व्हिडिओत दिसते आहे की, मैदानात खेळणाऱ्या दोन फलंदाजांपैकी एकाने धावबाद झाल्यावर दुसऱ्याच्या तोंडावर बॅट फेकून मारली आहे.
माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने हा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ आवडत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने इतर फलंदाजांसाठी एक महत्वाची सूचना दिली आहे. त्याने लिहिले आहे की, “बाद झाल्यानंतर कधीच बॅट फेकू नका” आणि पुढे हासण्याचे इमोजी टाकले आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CUCWq-_BJc3/?utm_source=ig_web_button_share_sheet
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, फलंदाज चेंडूवर शाॅट मारतो. त्यानंतर खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंचे खेळाडू धाव घेण्यासाठी पळतात. नॉन स्ट्राईकवरील फलंदाज निम्या खेळपट्टीपर्यंत पळत आलेला दिसत आहे. पण स्ट्राईकवरील खेळाडू धाव घेण्यासाठी घाबरतो आणि थोडा पूढे येऊन जागेवर थांबून चेंडूकडे पाहत राहतो. परिणामी खालच्या बाजूचा खेळाडू क्रिजपासून लांब असल्यामुळे बाद होतो.
बाद झाल्यावर तो खेळाडू चिडलेला दिसत आहे आणि तो मैदानाबाहेर जाताना जोरात हातातील बॅट खाली फेकण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या हातातून बॅट वेळेवर सुटत नाही आणि वरच्या बाजूला उभा असलेल्या फलंदाजाच्या तोंडावर जाऊन लागते. त्यानंतर ज्याने बॅट फेकली आहे, तो फलंदाज आणि अंपायर जखमी फलंदाजाकडे जाताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वरुणच्या चक्रव्यूहात अडकली आरसीबी, तरीही कर्णधार कोहली खूश; म्हणाला, ‘टी२० विश्वचषकात…’
सचिनच्या लेकीच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, टायगर श्रॉफच्या बहिणीनेही केली कमेंट
‘किंग’ कोहली सोडणार आरसीबीचं ‘सिंहासन’; अमूलचे खास कॅप्शनसह लक्षवेधी कार्टून, तुम्हालाही आवडेल






