ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह भारतीय संघाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले. या पराभवानंतर भारतीय संघावर अनेकजण टीका करताना दिसत आहेत. आता त्यामध्ये भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याचे देखील नाव सामील झाले आहे.
भारतीय संघाला या सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे कारण देताना हरभजन म्हणाला,
“कसोटी सामन्याचा निकाल अडीच तीन दिवसात लागतो. असे असताना तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊन अंतिम सामना कसा जिंकू शकता? भारतात तुमचे वेगवान गोलंदाज कसोटीत गोलंदाजी करताना दिसत नाहीत. तिथे तुमचे फिरकी गोलंदाज लगेच गोलंदाजीला येतात. अशावेळी तुम्ही काय अपेक्षा करता. तुम्हाला ही परिस्थिती बदलावी लागेल.”
भारतात होणाऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी या प्रामुख्याने फिरकीला मदत करणाऱ्या दिसून येतात. त्यामुळे पहिल्याच दिवशी चेंडू मोठ्या प्रमाणात वळताना दिसतो.
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी शतके झळकावली. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 467 धावा केल्यानंतर भारतीय संघ 296 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी करत आपली आघाडी वाढवली. विजयासाठी 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाच्या खेळानंतर भारताने 3 बाद 164 धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 280 धावांची गरज होती. मात्र, भारतीय फलंदाजी एका सत्रात ढेपाळल्याने संघाला 209 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.
(Harbhajan Singh Slams BCCI For Spin Friendly
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या पराभवामागील खरे व्हिलन ‘हे’ 2 खेळाडू! नेटकरीही म्हणाले, ‘बीसीसीआयने त्यांना घेतलंच कशाला?’
WTC फायनलचा पराभव विराटच्या जिव्हारी, एक शब्दही न बोलण्याचा घेतला निर्णय; स्टोरी पाहून व्हाल भावूक