---Advertisement---

देर आये दुरुस्त आये! चौदा वर्षांनंतर भज्जीला चुकीची जाणीव, श्रीसंतसोबतच्या ‘थप्पड कांड’वर दिली प्रतिक्रिया

bhajji-sree
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रत्येक हंगामात अनेक चर्चात्मक किस्से पाहायला मिळतात. त्यातील काही घटना चाहते कधीच विसरणार नाही. २००८मध्ये आयपीएलच्या पहिल्याच हंगामात अशीच एक गोष्ट घडली. त्यातील हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यात झालेली बाचाबाची चाहत्यांच्या कायम लक्षात राहणार आहे. भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन (Harbhajan Singh) आणि श्रीसंत (S Sreesanth) यांच्यात झालेल्या ‘थप्पड प्रकरणाला’ आता चौदा वर्ष झाली आहेत. आता १४ वर्षांनंतर आपल्याकडून चूक झाली याची जाणीव हरभजनला झाली आहे.

याआधीही हरभजनने त्याची चूक कबूल केली आहे. “खेळामध्ये खेळाडूंनी आपल्या भावनांवर ताबा ठेवणे आवश्यक असते. त्यादिवशी जे झाले, त्यामध्ये माझीच चूक होती,” असे हरभजनने म्हटले आहे.

हरभजनला केलेली ती चूक आणि त्या चुकीची त्याला झालेली जाणीव याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना हरभजन म्हणाला, “त्यावेळी सामन्यात श्रीसंतने काही हालचाली केल्या होत्या. त्याच्या या भावना पाहून मला राग अनावर झाला. पण मी त्याला चापट मारली नव्हती. मात्र त्यादिवशी माझ्याकडून चूक झाली. असे व्हायला नको होते. मी श्रीसंतला दिलेल्या वागणुकीची चूक सुधारेल, ” असे म्हटले आहे.

आयपीएलच्या (Indian Premier League- IPL) पहिल्या हंगामात मोहाली येथे झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात ही घटना घडली होती. यावेळी हरभजन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) तर श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. या प्रकरणानंतर हरभजनला त्या संपूर्ण हंगामात बंदी घातली. त्याचबरोबर पाच वनडे सामन्यातही त्याच्यावर बंदी आणली होती.

श्रीसंतने भारतीय संघाकडून खेळताना अनेक महत्वाच्या सामन्यात संघाला सामने जिंकून दिले आहे. भारताकडून २००७ टी२० विश्वचषक आणि २०११चा वनडे विश्वचषक विजयी संघात त्याचा समावेश होता. तसेच त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोची टस्कर्स केरळ या संघाकडूनही सामने खेळले आहेत.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘भारतात मला खूपच शाप दिले गेले, म्हणूनच…’ आयपीएल खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य

चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली

मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---