भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग याने सोमवारी (१८ जुलै) आपली ‘सेकंड इनिंग’ सुरू केली. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर हरभजनने राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आल्यावर त्याला राज्यसभेचे सदस्य देण्यात आलेले. त्याच आपल्या राज्यसभा सदस्यत्वाची त्याने शपथ घेतली. आपल्या ट्विटर हँडलवरून त्याने हा व्हिडिओ शेअर केला.
Took Oath as Member of Parliament (Rajya Sabha) to protect the Constitution, Rule of Law and Dignity of the House . I will do my best for the people of Punjab and Nation .. Jai Hind Jai Bharat pic.twitter.com/5qkjHEQkn2
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 18, 2022
हा व्हिडीओ पोस्ट करताना हरभजनने लिहिले आहे की, “संविधान, कायदा आणि सदन वाचवण्यासाठी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. मी माझा देश आणि पंजाबसाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन. जय हिंद जय भारत”
मागील वर्षी त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो राजकारणात जाणार अशा चर्चा सुरू झालेल्या. त्यावेळी काँग्रेसचे नेते असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांची त्याने भेट घेतलेली. मात्र, त्यानंतर अचानकपणे तो आम आदमी पार्टीत सामील झाला.
चालू वर्षाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १८ जुलै रोजी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सर्व नवनियुक्त राज्यसभा खासदारांना पद व गोपनीयतेची शपथ दिली गेली. हरभजनने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर २०११ विश्वचषक विजेत्या संघातील गौतम गंभीरसह तो देशाच्या सर्वोच्च सदनात जनसामान्यांचा आवाज उठवेल. गंभीर २०१९ लोकसभा निवडणुकी वेळी निवडून येत खासदार बनला होता.
खेळाडू म्हणून दैदीप्यमान राहिली कारकीर्द
हरभजन सिंग याची खेळाडू म्हणून भारतीय संघासाठी दैदिप्यमान कारकीर्द राहिली आहे. २००७ टी२० व २०११ वनडे विश्वचषक विजेत्या संघात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान होते. अनिल कुंबळे नंतर त्याला भारताचा दुसरा सर्वात्तम फिरकीपटू मानले जाते. हरभजनने १०३ कसोटीत ४१७ व २३६ वनडेत २६९ बळी मिळवले आहेत. आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले. सध्या तो अनेकदा समालोचन करताना दिसतो.
महत्त्वाच्या बातम्या-
हा शुद्ध वेडेपणा! शतक पूर्ण होताच रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना धरलं धारेवर, पाहा व्हिडिओ
संघ ठरले आता ठिकाण अन् वेळही निश्चित! वाचा भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
ब्रेकिंग! इंग्लंडच्या कर्णधाराची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा