इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल तुफान फलंदाजी करत आहे. गुरुवारी (11 मे) जयस्वालने आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. अवघ्या 13 चेंडूंमध्ये त्याने ही कामगिरी केली. त्याचे या चालू आयपीएल हंगामातील आणि त्याआधी देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शन पाहून भारताचा माजी दिग्गज हरभजन सिंग चांगलाच प्रभावित झाला आहे. हरभजनच्या मते जयस्वालने भारतीय संघाच्या निवडकर्त्यांपूठे संघात जागा देण्यासाठी दावेदारी सिद्ध केली आहे.
आयपीएल 2023मध्ये जशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) जोस बटलरच्या साथीने राजस्थान रॉयल्ससाठी डावाची सुरुवात करत आहे. चालू हंगामातील 12 सामन्यांमध्ये जयस्वालने 52.27च्या सरासरीने आणि 167.15च्या स्ट्राईक रेटने 575 धावा केल्या आहेत. जयस्वालपुढे जगभारीताल घातक गोलंदाज अक्षरशः गुडघे टकताना दिसत आहेत. चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहता जयस्वालला लवकरात लवकर भारतासाठी खेळण्याची संधी मिळावी, अशी इच्छा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने व्यक्त केली. हरभजनच्या मते यशस्वी जयस्वाल भारतीय संघाचा दरवाजा फक्त ठोठावत नाहीये, तर तोडण्याच्या मार्गावर आहे.
एका वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हरभजन सिंग म्हणाला, “यशस्वी जयस्वाल भारतीय संघाचा दरवाजा फक्त ठोठावत नाहीये. मला वाटते तो आपल्या सततच्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर हा दरवाजा तोडून टाकेल. दो डॉमेस्टिक क्रिकेटमधील आपला दमदार फॉर्म आयपीएलपर्यंत घेऊन आला आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये आहे.” दरम्यान, यावर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जोरदार तयारीत आहे. अशात जयस्वाल आणि रिंकू सिंग यांसारख्या युवा खेळाडूंना जास्तित जास्त संधी मिळाली पाहिजे, असे मत संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. रिंकू सिंगने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या सलग पाच चेंडूंवर पाच षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला होता. (Harbhajan Singh’s comment on Yashasvi Jaiswal)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जयस्वालच्या वादळी खेळीमागे आहे ‘हे’ सिक्रेट, सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘ही खेळी दीर्घकाळ…’
वर्ल्डकप क्वालिफायर्ससाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा! आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूला मिळाले नाही स्थान