इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत सध्या भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. यादरम्यान शार्दुल ठाकुरने या मालिकेत आपल्या दमदार प्रदर्शनाने एक चांगला ठसा उमटवला आहे. ज्यामुळे शार्दुलचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच त्याला संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा देखील पर्याय खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. एवढेच नाही तर भारताचा माजी फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगने तर शार्दुलची तुलना कपिल देव यांच्याशी केली.
आतापर्यंत शार्दुलने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागातून उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. ओव्हल कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयात शार्दुलचे महत्त्वाचे योगदान होते. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील त्याने कमालीचे प्रदर्शन केले होते.
याबाबत हरभजन सिंग टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना म्हणाला, “ओव्हलमधील आपल्या दमदार खेळीनंतर शार्दुल ठाकूरचा आत्मविश्वास खूप वाढला असेल. शार्दुलने जर आपली फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीवर नियमित लक्ष दिले, तर तो कपिल देव यांच्या नंतर भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूची असलेली समस्या सोडवू शकतो. ज्याप्रकारे त्याने फलंदाजी केली, ती अत्यंत उल्लेखनीय होती. यामुळे त्याचा आत्मविश्वास खूप वाढला असेल.”
तर दुसरीकडे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्यांचे मत व्यक्त करताना म्हणाले, “कपिल देव यांच्यासारखा अष्टपैलू खेळाडू बनणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नाही. निश्चितच कपिलदेव यांच्यासारखा अष्टपैलू खेळाडू मिळवण्यासाठी आणखी खूप लोकांना जन्म घेण्याची गरज आहे. मला वाटते हे शक्य नाही. परंतु विराट कोहली जवळ सध्या अष्टपैलू खेळाडू म्हणून अनेक पर्याय आहेत. जे संघात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आणि खालच्या फळीत चांगली खेळी करू शकतात.”
कपिल देव हे भारतीय संघाचे आतापर्यंतचे महान असे अष्टपैलू खेळाडू होते. त्यांनी त्यांच्या नेतृत्वपदात १९८३ शाली भारतीय संघाला जेतेपद देखील मिळवून दिले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट इतिहासात कपिलदेव यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारत-इंग्लंड संघात पुढीलवर्षी खेळवली जाणार एकदिवसीय आणि टी-२० मालिका; असे आहे वेळापत्रक
–शिखर धवन पूर्वी ‘या’ ४ भारतीय क्रिकेटपटूंचाही झाला होता घटस्फोट; एक आहे भारताचा माजी कर्णधार
–गेल्या ८५ वर्षात भारताने मँचेस्टरचे मैदान एकदाही केले नाही काबीज; अशी आहे ओल्ड ट्रॅफर्डवरील एकूण कामगिरी