Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटला हरवताच हार्दिक पांड्याची मोठी प्रतिक्रिया, “इथे ज्युनियर सिनियर काही नसतं”

विराटला हरवताच हार्दिक पांड्याची मोठी प्रतिक्रिया, "इथे ज्युनियर सिनियर काही नसतं"

May 1, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Hardik-Pandya

Photo Courtesy: iplt20.com


आयपीएल २०२२च्या आपल्या नवव्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६ विकेट्स राखून पराभूत केले. हा गुजरातचा हंगामातील आठवा विजय होता. यानंतर गुजरातचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित दिसत आहे. संघाच्या धमाकेदार प्रदर्शनानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने स्पष्ट केले आहे की, त्याच्या संघात कोणी लहान मोठे नाही. सर्वजण मिळून एक संघटना म्हणून पुढे जात आहेत.

सामन्यानंतर हार्दिक (Hardik Pandya) म्हणाला की, “एका व्यक्तीच्या रूपात मी फक्त माझ्या एकट्याचा विकास करत नाहीय. मला माझ्या संघ सहकाऱ्यांसोबत किंवा माझ्या आसपासच्या लोकांसोबत पुढे जायला आवडते. हेच आमच्या यशामागचे कारण आहे. मी माझ्या संघाचा संघनायक आहे, पण माझ्या संघात कोणीही ज्युनियर किंवा सिनियर (Nobody Is Junior Or Senior) नाही. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकजण एकाच मार्गाने पुढे जातो, सर्वांचे एकच लक्ष्य आहे. माझ्या संघातील प्रत्येकाला वाटते की, तो कर्णधाराइतकाच संघासाठी महत्त्वाचा आहे.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पुढे आपल्या नेतृत्त्वाच्या जबाबदारीबद्दल बोलताना हार्दिक (Hardik Pandya Statement) म्हणाला की, “मी नव्या भूमिकेचा आनंद घेतोय. माझ्या आसपास शानदार लोकांचा समूह आहे. ज्याप्रकारे गोष्टी आमच्या बाजूने राहिल्या आहेत, त्यावरून मी चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करू शकत नाही.”

गुजरात संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी
दरम्यान गुजरातचा संघ सध्या सर्वाधिक विजयांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत ९ सामने खेळले असून त्यापैकी ८ सामने जिंकले आहेत आणि केवळ १ सामना गमावला आहे. त्यांच्या खात्यात सध्या १६ गुण आहेत. तसेच त्यांचा नेट रन रेट ०.३७७ इतका आहे.

तेवतियाने बेंगलोरच्या तोंडून खेचला विजयाचा घास
दरम्यान गुजरात आणि बेंगलोर (RCB vs GT) संघातील सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या. बेंगलोरकडून विराट कोहलीने ५८ व रजत पाटीदारने ५२ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.३ षटकातच ४ विकेट्सच्या नुकसानावर बेंगलोरचे लक्ष्य पूर्ण केले. राहुल तेवितयाच्या २५ चेंडूतील नाबाद ४३ धावांच्या खेळीचा यात मोठा वाटा राहिला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

केविन पीटरसनने निवडले आयपीएल २०२२ विजेतेपदाचे ३ प्रबळ दावेदार, हार्दिकच्या संघाचाही समावेश

‘थाला इज बॅक’, धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार बनताच सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

हार्दिकच्या खिलाडूवृत्तीला सलाम! बेंगलोरच्या फलंदाजाचा झेल घेऊनही पंड्या म्हणाला, ‘Not Out’, पण का?


ADVERTISEMENT
Next Post
Tim-Southee

IPL | सलग ५ पराभवाने खचला 'हा' दिग्गज; म्हणाला, 'संघात सतत बदल का करताय?'

Kumar-Kartikeya-and-Danial-Sams

पहिल्याच सामन्यात सॅमसनची विकेट घेणारा मुंबई इंडियन्सचा नवा भिडू आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

KL-Rahul

दिल्लीच्या गोलंदाजांची केएल राहुलकडून मनसोक्त धुलाई, 'या' खास यादीतील बनला नवा 'सिक्सर किंग'

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.