मुंबई । इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. कोरोनामुळे या स्पर्धा कधी होतील हे निश्चितपणे सांगता येणार नाही. दरम्यान, काही दिग्गज खेळाडूंनी त्यांची सर्वकालीन आयपीएलचा संघ निवडत आहेत. हार्दिकनेही त्याचा संघ निवडला असून या संघात रोहित’विराट आणि महेंद्रसिंग धोनी यांना स्थान दिले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने चार तर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले तर विराटच्या नेतृत्वाखाली खेळणारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला अद्याप हे जेतेपद पटकावता आले नाही.
हार्दिकने निवडलेल्या संघाची जबाबदारी आश्चर्यकारक रित्या त्याने रोहितच्या ऐवजी धोनीवर सोपवली आहे.
विशेष म्हणजे बहुदा जो खेळाडू संघ निवडतो तो खेळाडू त्या संघात सहभागी नसतो. मात्र हार्दिकने या संघात अष्टपैलू म्हणून स्वतःला निवडले आहे. सलामीची जबाबदारी रोहित आणि ख्रिस गेल या दोन स्फोटक खेळाडूंवर सोपवण्यात आली. तिसऱया स्थानासाठी विराटला संधी मिळाली आहे तर चौथ्या स्थानासाठी एबी डिव्हिलर्सला निवडले.
स्टायलिश फलंदाज सुरेश रैना देखील या संघात आहे. संघात सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पंड्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हार्दिक पंडय़ाने त्याचा भाऊ कुणाल पंड्याला याला संघात निवडले नाही. गोलंदाजीची मदार सुनील नरेन, राशिद खान, जसप्रीत बुमरा आणि लसिथ मलिंगा यांच्याकडे सोपवली आहे. हार्दिकच्या संघात मुंबई इंडियन्सचे तीन चेन्नई सुपर टीमच्या दोन खेळाडूंना निवडण्यात अाले आहे.
हार्दिक पंड्या चा ऑल-टाइम IPL XI:
ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिविलियर्स, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), हार्दिक पंड्या, सुनील नरेन, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.