---Advertisement---

हार्दिकचे सडेतोड उत्तर! पाकिस्तानी पत्रकाराची बोलतीच बंद

---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा भारतीय संघाने जिंकून संपवली. विजयानंतर संपूर्ण संघ जल्लोषात बुडाला. स्पर्धा संपल्यानंतरही पाकिस्तानचा दौरा न करण्याचा मुद्दा संपलेला नाही. विजयानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत निवृत्ती न घेण्याची आनंदाची बातमी दिली. यानंतर हार्दिक पंड्याही आनंदाने परिषदेत आला, पण एका पाकिस्तानी पत्रकाराने एक हास्यास्पद प्रश्न विचारला. त्यानंतर पांड्याने त्या पत्रकाराचे बोलणे थांबवले. हार्दिकच्या जबरदस्त उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी ने हार्दिक पांड्या से प्रश्न, ‘सगळ्यात आधी तुमचे अभिनंदन तुम्ही विजेते झाल्याबद्दल. माझा तुमच्यासाठी प्रश्न हा आहे की, तुम्ही ज्या प्रकारे दुबई मध्ये खेळला आणि सर्व सामने जिंकले, प्रत्येक सामन्यात भरपूर चाहत्यांनी हजेरी लावली होती. पाकिस्तानी चाहत्यांची देखील हीच इच्छा होती की तुम्ही तिथे जाऊन खेळायला पाहिजे. तिथे देखील तुमचे प्रचंड चाहते आहेत.

हार्दिक पांड्याने थेट उत्तर दिले, ‘ तिथे देखील चाहते होते ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु ही शक्य झाले नाही. पण मला विश्वास आहे की, दुबई मध्ये असलेल्या पाकिस्तानी चाहत्याने हे सर्व नक्कीच एन्जॉय केले असेल. याशिवाय, भारतीय संघ पाकिस्तान मध्ये गेला नाही, मी याबद्दल काहीही करू शकत नाही.’

भारतीय संघाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह काही भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये चॅम्पियन्स पुन्हा एकदा खेळताना दिसतील.

 

महत्वाच्या बातम्या : 

कसोटी क्रिकेटचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव – विशेष सामन्यासाठी रंगणार मैदान!

आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचा बोलबाला, पहा कितव्या क्रमांकावर!

IPL 2025 च्या सुरुवातीस केएल राहुल बाहेर, हॅरी ब्रूकने करार संपवला!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---