आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. परंतु दोन्ही भाऊ सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. त्यामध्ये काही दिवसापु्र्वी हार्दिकने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही भाऊ आपल्या पत्नींसोबत डान्स करताना दिसत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हे दोन खेळाडू आयपीएल सामन्यांमध्ये चांगली खेळी करण्याबरोबर आपल्या कुटुंबियांसमवेत खूप मजा करताना देखील दिसतात. हार्दिकने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हार्दिकशिवाय त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेनकोविक, त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्या आणि वहिनी पंखुडी शर्मा हे चौघे हॉटेलच्या बागेत ठुमके मारताना दिसत आहेत.
या शेअर केलेल्या व्हिडीओला लोक खूप पसंत करत असून कमेंट्सदेखील करत आहेत. याशिवाय अनेक मोठमोठ्या सेलेब्रिटींनी देखील यावरती प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेल हिने सुद्धा या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
खरे तर या व्हिडीओमध्ये वाजत असलेले गाणे हे प्रसिद्ध इंग्लिश गायक जस्टिन बिबर याचे आहे. हा व्हिडिओ शेअर करताना हार्दिकने ‘द ड्रीम क्रीम’ असे लिहून त्यामध्ये आपला भाऊ कृणाल, पत्नी, वहिनी आणि प्रसिद्ध गायक जस्टिन बिबर यांना टॅग केले आहे.
इथे पाहा व्हिडीओ-
https://www.instagram.com/reel/CNz5IDaljDQ/?igshid=1o6pyn81gy63d
त्यामुळे पूर्णा पटेल यांनी यावरती प्रतिक्रिया देताना हसणारा इमोजी पोस्ट करत ‘जस्टीन बीबर कोठे आहे?’ असे लिहले आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या कमेंटस्वर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोरोना विषाणूमुळे आयपीएल २०२१चे आयोजन बंद दाराआड करण्यात आले असून सामन्यानंतर खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
गेल, कोहली किंवा धोनी नव्हे तर ‘हे’ आयपीएलचे सर्वात खतरनाक फलंदाज, फिरकीपटू कुलदीपने सांगितली नावं
चेन्नई टू मुंबई, आरसीबीचा कर्णधार कोहली पत्नी अन् लेकीसह मुंबईत दाखल; विमानतळावरील Video व्हायरल