‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या म्हणी प्रमाणे मैदानावर सहज षटकार मारणारा खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या या फिनिशरची सध्या जगभर ख्याती आहे. आयपीएलमध्ये त्याने आता आणखी एक खास विक्रम रचला आहे.
रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हार्दिक पंड्याने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. २० चेंडू मध्येच त्याने आपले अर्धशतक झळकवून ६० धावांची वादळी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने राजस्थानच्या अंकित राजपुतवर निशाणा साधला. त्याच्या एकाच षटकात हार्दिकने चार षटकार ठोकले.
राजपुतने टाकलेल्या १८ व्या षटकाच्या पहिल्या आणि त्यानंतर सलग चौथ्या,पाचव्या, सहाव्या चेंडूवर हार्दिकने मोठे फटके खेळताना षटकार ठोकले. एकाच षटकात चार षटकार हार्दिक पंड्याने या अगोदरही एकदा मारलेले होते. त्यामुळे आयपीएलमध्ये २ वेळा एकाच षटकात ४ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा हार्दिक पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
तसेच युवराज सिंग, विराट कोहली, श्रेयस अय्यर, राहुल तेवातिया यांनी आयपीएलमध्ये एकाच षटकात ४ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा कारनामा एकवेळा केला आहे.
हार्दिकच्या याच खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १९५ धावां पर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून बेन स्टोक्सने नाबाद १०७ आणि संजू सॅमसनने नाबाद ५४ धावा करत राजस्थानला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘२०२१ वर्ष आपलंच असेल!’, चेन्नईचे आव्हान संपल्याने ट्विटरवर आल्या भावनिक प्रतिक्रिया
सुर्यकुमार यादवला मिळणार भारतीय संघात संधी? ‘या’ दिवशी होणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड
पुजारा, विहारी आणि शास्त्री लवकरच होणार युएईला रवाना, ‘हे’ आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ
आयपीएल२०२०: टी२० मधील स्टार असूनही ‘या’ ३ खेळाडूंना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ