आयपीएल २०२२ची रणधुमाळी संपली आहे. रविवारी (२९ मे) अंतिम सामन्यात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने पराभूत केले आणि आयपीएल चषक उंचावला. या अविस्मरणीय विजयात हार्दिकचाही मोठा वाटा राहिला. त्याने केवळ अंतिम सामन्यातच नव्हे तर संपूर्ण हंगामादरम्यान दमदार खेळ दाखवला. यासह एका खास यादीत त्याने आपल्या नावाची भर पाडली आहे.
हार्दिक (Hardik Pandya) संघाला आयपीएल चषक (IPL 2022 Winner) जिंकून देण्याबरोबरच त्या हंगामात संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही (Leading Scorer Of Gujrat Titans) राहिला आहे. तसेच असा पराक्रम करणारा केवळ पाचवा कर्णधारही बनला आहे.
हार्दिकने गुजरातकडून आयपीएल २०२२ मध्ये १५ सामने खेळताना ४४.२७च्या सरासरीने ४८७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ अर्धशतकेही निघाली आहेत. अशाप्रकारे तो गुजरात संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला आहे. हार्दिकपूर्वी ४ कर्णधार असे राहिले आहेत, ज्यांनी संघाला ट्रॉफी जिंकून दिली आहे आणि ते त्या हंगामातील संघाकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडूही राहिले आहेत. ऍडम गिलख्रिस्ट, गौतम गंभीर, रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर यांनी ही कमाल केली होती.
कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकताना संघासाठी सर्वाधिक धावा-
२००९: ऍडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जर्स, ४९५ धावा)
२०१२: गौतम गंभीर (कोलकाता नाईट रायडर्स, ५९० धावा)
२०१३: रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स, ५३८ धावा)
२०१६: डेविड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद, ८४८ धावा)
२०२२: हार्दिक पांड्या* (गुजरात टायटन्स, ४७८ धावा)
विजेत्या आयपीएल संघाकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (Leading Scorer for Champions)-
२००८: शेन वॉटसन
२००९: ऍडम गिलख्रिस्ट
२०१०: सुरेश रैना
२०११: माईक हसी
२०१२: गौतम गंभीर
२०१३: रोहित शर्मा
२०१४: रॉबिन उथप्पा
२०१५: लिंडल सिमन्स
२०१६: डेविड वॉर्नर
२०१७: पार्थिव पटेल
२०१८: अंबाती रायुडू
२०१९: क्विंटन डी कॉक
२०२०: इशान किशन
२०२१: ऋतुराज गायकवाड
२०२२: हार्दिक पंड्या
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बाबो! आयपीएलमधील एका बॉलची किंमत आहे तब्बल २१ लाख
Video: गुजरातने आयपीएल ट्रॉफी जिंकताच बीसीसीआयचे सचिव शहांच्या आनंदाला उधाण, लागले नाचू
आयपीएल कॉमेंटेटरना पगार मिळतो तरी किती? घ्या जाणून