इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल भारतात क्रिकेटचं वेड भल्याभल्यांना सोडवलं नाही. मास्टर- ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जगाने क्रिकेटचा देव घोषित केलंच आहे. मात्र, असे अनेक क्रिकेटर्स आहेत, ज्यांना आपल्या देशात देवाचा दर्जा दिला जातो. त्या खेळाडूंच्या विजयात आनंद आणि पराभवात दु:ख व्यक्त केलं जातं. अशाच एका खेळाडूचा जबरा फॅन भारतातील बिहार राज्यात पाहायला मिळाला. खेळाडूचे नाव आहे हार्दिक पंड्या आणि त्या जबराट फॅनचं नाव रवी पंड्या.
रवीचे खरे आडनाव पंड्या नाही, पण गुजरातच्या संघाने हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) विजयाच्या आनंदात सामील होत रवीने आपले नामकरण करत पंड्या आडनाव स्वीकारले. सोबतच बिहारमधील नवादा परिसरात चालवत असलेल्या सलूनचे नावही बदलत पंड्या जेन्ट्स पार्लर केले. शिवाय गुजरात टायटन्स आयपीएल जिंकल्यानंतर विजयाच्या खुशीत एक दिवस सलूनमधील सर्व ग्राहकांना फ्रीमध्ये सेवा देण्याची ऑफर दिली.
रवीने सलूनमध्ये आलेल्या ग्राहकांची मोफत कटिंग आणि दाढी केली. रवीने सलूनबाहेर पोस्टर लावून अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला. नवादा येथील नगर पोलीस स्टेशन हद्दीतील अकौना रोडवर रवीचे दुकान आहे. त्याची क्रिकेटची आवड आणि हार्दिक पंड्या हा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
गुजरात टायटन्स हा रवीचा आवडता संघ असून हार्दिक हा त्याचा आवडता खेळाडू असल्याचे त्याने सांगितले. रवीने सोशल मीडियावर सलूनमध्ये मोफत सेवेची घोषणा केली. यानंतर सकाळपासूनच लोक त्याच्या पार्लरमध्ये येऊ लागले. रवी म्हणाला की, हार्दिक पांड्या त्याचा आवडता खेळाडू असून हार्दिकला भेटण्याची रवीची मनापासून इच्छा आहे.
दरम्यान, याआधीही अनेक खेळाडूंचे असेच जबराट फॅन्स पाहायला मिळाले आहेत. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनचा देखील असाच एक फॅन जगाला ज्ञात झाला. च्या फॅनचे नाव सुधीर कुमार चौधरी. हा सुधीर स्व खर्चाने सचिन आणि भारताच्या प्रत्येक मॅचवेळी मैदानावर हजेरी लावायचा. सचिन तेंडुलकरची जर्सी अंगावर रेखाटत सुधीर सचिन आणि भारतीय संघाला समर्थन करताना दिसायचा. त्यानंतर सचिनने आपल्या या फॅनची दखल घेत सुधीरची भेट घेतली होती.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बांगलादेशच्या कर्णधाराचा कसोटी नेतृत्त्वपदावरून राजीनामा, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
अशोका इलेव्हन, लिजेंड्स युनायटेडचा सहज विजय