टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा आज (11 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. तो आता 31 वर्षांचा झाला. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरातच्या सुरत येथे झाला होता. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3,800 पेक्षा अधिक धावा आणि 188 विकेट घेतल्या आहेत. तो 2024 मध्ये बीसीसीआयचा ग्रेड ए खेळाडू आहे, ज्याला वर्षाला 5 कोटी रुपये वेतन मिळतं. याशिवाय तो आयपीएल, स्पॉन्सरशीप आणि अन्य मार्गांद्वारे भरपूर कमाई करतो. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, लहानपणी हार्दिक पांड्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याच्या परिवारानं खूप संघर्ष केला आहे.
हार्दिक पांड्याचे वडील हिमांशू पांड्या यांचा सूरतमध्ये कारचा व्यवसाय होता. मात्र हा व्यवसाय डबघाईला येत असल्यामुळे ते सूरत सोडून वडोदरामध्ये आले. येथे त्यांनी आपले मुलं हार्दिक आणि क्रुणाल यांची क्रिकेट कोचिंग सुरू केली. मात्र सुरुवातीला त्यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. हार्दिक आणि क्रुणालकडे क्रिकेट किट घेण्यासाठी देखील पैसे नसायचे. त्यामुळे ते दोघे स्थानिक स्पर्धांमध्ये 200 रुपयांसाठी खेळायचे, ज्याद्वारे त्यांना क्रिकेटचं सामान घेण्यासाठी मदत मिळायची.
हार्दिक पांड्याची सध्याची एकूण कमाई 94 कोटी रुपयांच्या आसपास आहे. हार्दिकला महागड्या घड्याळांची आवड आहे. त्याला अनेकदा महागडे घड्याळं घालून स्पॉट करण्यात आलंय. याशिवाय त्याच्याकडे काही अलिशान कार देखील आहेत. यामध्ये 6 कोटी रुपयांच्या रोल्स रॉयल्स कारचा देखील समावेश आहे. याशिवाय त्याच्याकडे लॅम्बरगिनी हरेकेन आणि रेंज रोव्हर वोग सारख्या गाड्या आहेत, ज्यांची किंमत साडे तीन कोटी आणि 4 कोटी रुपये आहे.
हेही वाचा –
पाकिस्तानचा दिग्गज वकार युनूसने निवडली ऑल टाईम इलेव्हन, फक्त एका भारतीयाला दिलं स्थान
‘रूटला त्रास देणारा एकच गोलंदाज आहे, तो म्हणजचे भारतीय…’ इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी प्रतिकिया..
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी संघाला मोठा धक्का, रोहित शर्मानंतर हा अष्टपैलू खेळाडू मालिकेतून बाहेर?