---Advertisement---

“हार्दिक पांड्या 18 कोटी रुपयांचा खेळाडू नाही”, माजी मुख्य प्रशिक्षकाचं धक्कादायक वक्तव्य

---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) अलीकडेच जाहीर केलं की, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझी 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात राईट टू मॅच (RTM) कार्डचा देखील समावेश आहे. मेगा लिलावापूर्वी जर संघाला आपल्या खेळाडूला रिटेन करायचं असेल, तर त्यासाठी त्यांना दोन खेळाडूंना 18-18 कोटी रुपये, दोन खेळाडूंना 14-14 कोटी रुपये आणि एका खेळाडूला 11 कोटी रुपये द्यावे लागतील. अनकॅप्ड खेळाडूला रिटेन केल्यास त्याला 4 कोटी रुपये द्यावे लागतील.

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचे माजी मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी अतिशय आश्चर्यकारक व्यक्तव्य केलं आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या 18 कोटी रुपयांच्या रिटेन्शनसाठी पात्र नाही, असं ते म्हणाले. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना ते म्हणाले, “आयपीएलच्या शेवटच्या हंगामात ज्या प्रकारे गोष्टी घडल्या, त्यामुळे रोहित शर्मा थोडा निराश असेल. मी जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यांना 18 कोटी रुपये आणि हार्दिक पांड्याला 14 कोटी रुपयांनी रिटेन करेल. जर तुम्ही फिटनेस, कामगिरी आणि फॉर्म या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर हार्दिक पांड्या खरंच 18 कोटींचा खेळाडू आहे का? असा विचार करावा लागेल.”

ते पुढे बोलताना म्हणाले, “जर तुम्हाला 18 कोटी रुपयांचा खेळाडू व्हायचं असेल, तर तुम्हाला मॅच विनर बनावं लागेल आणि हे नियमित करावं लागेल. हार्दिक पांड्या गेल्या हंगामात या सर्व बाबींशी झगडत होता.”

सनरायझर्स हैदराबाद सोबत आयपीएल 2016 जिंकणाऱ्या या मुख्य प्रशिक्षकानं पुढे स्पष्ट केलं की, मुंबई इंडियन्सनं गेल्या काही हंगामात वेगळ्या प्रकारची रणनीती अवलंबली, ज्यामुळे ते अडचणीत आले. आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी इशान किशन आणि जोफ्रा आर्चरचं उदाहरण दिलं.

मूडी म्हणाले, “गेल्या काही वर्षांत लिलावात त्यांना (मुंबई इंडियन्स) अडचणींचा सामना करावा लागलाय. काही खेळाडूंसाठी त्यांनी मोठी किंमत मोजली. इशान किशन आणि जोफ्रा आर्चर याची उत्तम उदाहरणं आहेत. मी इशान किशनकडे पाहतो आणि विचार करतो की तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु त्यानं किती सामने जिंकवले आहेत? यामुळे संघाला यंदा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.”

हेही वाचा – 

टी20 विश्वचषकात हिजाब घालून उतरली खेळाडू, पाकिस्तानशी आहे खास संबंध
बाबर आझमनं पाकिस्तानचं कर्णधारपद का सोडलं? कोच कर्स्टन यांच्या अहवालात मोठा खुलासा
“हे पूर्णपणे खोटं आहे”, हरभजन सिंगच्या धोनीवरील वक्तव्यावर सीएसकेच्या स्टाफचं उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---