भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या वनडे वर्ल्डकप 2023 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तसेच आता तो आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन्सी, रणजी ट्रॉफी आणि बीसीसीआय काँट्रॅक्ट या चर्चांना उधाण आलं होतं. याबरोबरचहार्दिक पांड्याने पदार्पण केल्यापासून आत्तापर्यत भारतीय संघासाठी किती सामने खेळला आहे ते आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
खरंतर, हार्दिक पांड्याने गेल्या पाच महिन्यांपासून क्रिकेट खेळलेले नाही. तसेच तो 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधून बाहेर पडला, तेव्हापासून तो मैदानातून बाहेर होता. आता आयपीएल 2024 जवळ आल्याने त्याने स्वत:ला फिट केले असन तो डीवाय पाटील स्पर्धेत खेळत आहे. तसेच या डी.वाय. पाटील ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत हार्दिकने अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या रिलायन्स-एक संघाने बीपीसीएल संघाला दोन विकेटने हरवले आहे.
याबरोबरच हार्दिक पांड्याने पदार्पण केल्यापासून भारताने 160+ टी-20 सामने खेळले असून हार्दिक पांड्या फक्त 92 टी-20 सामने खेळला आहे. तसेच हार्दिक पांड्या दुखापती आणि इतर कारणांमुळे तो 43% सामने खेळू शकला नाही. तर हार्दिक पांड्याने पदार्पण केल्यापासून 156 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने फक्त 86 सामने खेळला आहे. तर तो दुखापती आणि इतर कारणांमुळे तो 45% सामने खेळू शकला नाही. त्याबरोबरच हार्दिक पांड्याने पदार्पणापासूनच भारतीय संघासाठी फक्त 17% कसोटी सामने खेळला आहे.
दरम्यान, आयपीएल 2024 च्या निम्म्या शेड्यूलची घोषणा झाली असून 24 मार्चला म्हणजे या सीजनच्या तिसऱ्यादिवशी होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. तस बघायला गेलं तर हा फक्त एक सामना आहे. पण अनेक वर्षानंतर मुंबईची टीम एका दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळायला मैदानात उतरेल. मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आल. त्याच्याजागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलय. हार्दिक मागच्या सीजनपर्यंत गुजरात टायटन्सचा कॅप्टन होता. पण ट्रेड करुन मुंबई इंडियन्सने त्याला आपल्याकडे घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या दुखापतीवर लंडनमधील उपचारानंतर दिली मोठी अपडेट, आयपीएलसह या स्पर्धेला मुकणार
- IPL 2024 : RCBसाठी आनंदाची बातमी! आयपीएलपूर्वी कॅमेरॉन ग्रीनने झळकावले दमदार शतक