आयपीएल 2024 मधील निराशाजनक कामगिरीनंतर स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यानं टी20 विश्वचषकात जोरदार पुनरागमन केलं. तेव्हापासून त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी ठीक चालल्या होत्या, मात्र गेल्या काही दिवसांपासून बरंच काही बदललं आहे.
सर्वप्रथम हार्दिक पांड्याला भारतीय टी20 संघाच्या कर्णधारपदासाठी डावलण्यात आलं. त्यानंतर त्याच दिवशी त्यानं आणि पत्नी नताशा स्टॅनकोविच यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याची घोषणा केली. मात्र, त्यावेळी दोघेही मुलगा अगस्त्याची काळजी घेणार असल्याचं बोलले होते. सध्या हार्दिकचा मुलगा नताशासोबत सर्बियामध्ये आहे. दरम्यान, आपल्या मुलापासून दूर असूनही हार्दिक त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास विसरला नाही. हार्दिक पांड्यानं सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ शेअर करून मुलगा अगस्त्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी मे 2020 कोविड लॉकडाऊन दरम्यान लग्न केलं होतं. यानंतर दोघांनीही मुलाच्या आगमनाची घोषणा केली. 30 जुलै 2020 रोजी अगस्त्यचा जन्म झाला. आज त्याचा चौथा वाढदिवस आहे. यानिमित्त हार्दिक पांड्यानं त्याला शुभेच्छा दिल्या.
हार्दिकनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो आपल्या मुलासोबत काही खास क्षण घालवताना दिसत आहे. व्हिडिओसोबत हार्दिकनं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “तु मला दिवसभर चालण्यास मदत करतो. माझ्या क्राईम पार्टनरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यावरील माझं प्रेम मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.” हार्दिक पांड्याच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. चाहते या पोस्टवर कमेंट करून अगस्त्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी 18 जुलै रोजी एकमेकांपासून वेगळे झाल्याची पुष्टी केली. दोघांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या. आयपीएल दरम्यानही नताशा मुंबई इंडियन्सच्या एकाही सामन्यात स्टेडियममध्ये दिसली नव्हती. आता या दोघांनी घटस्फोट घेत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
हेही वाचा –
टी20 लीग आहे की गल्ली क्रिकेट! मैदानाबाहेर षटकार मारताच चाहता चेंडू घेऊन भूर्र…मजेशीर व्हिडिओ व्हायरल
“कधीच नाही विसरणार तो क्षण…” टी20 विश्वचषक फायनलमध्ये घेतलेल्या झेलवर सूर्यकुमारनं दिली प्रतिक्रिया
आशिया चषकातील चुकांमधून शिका! मिताली राजने भारतीय संघाला सांगितली आगामी विश्वचषकाची रणनिती