खरं क्रिकेट कोणतं ? असा साधा जरी प्रश्न कुणीही विचारला तर चटकन उत्तर मिळते ते म्हणजे कसोटी क्रिकेट. मग ह्याच कसोटी क्रिकेटमध्ये जर तुम्हाला देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळालं तर?
भारतीय क्रिकेट संघासाठी मर्यादित षटकांत जबदस्त कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याच हे स्वप्न पूर्ण झालं आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघाचं नवीन जर्सीमध्ये फोटो सेशन झालं तेव्हा हार्दिकला भारतीय संघाची जर्सी घालण्याची संधी मिळाली.
हार्दिक पंड्याने आजपर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेषतः एकदिवसीय सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. त्याने त्याने १७ एकदिवसीय सामन्यांत ४१.२८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या असून १९ विकेट्स देखील मिळवल्या आहेत.
यामुळे आनंदी झालेल्या हार्दिकने खास ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, लहानपणापासून जे स्वप्नं मी पाहत होतो, ते आज पूर्ण होताना दिसतंय, यापेक्षा आनंदाचा दिवस कोणता असू शकेल? ”
https://twitter.com/hardikpandya7/status/889749965815164928
विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहलीने हार्दिकला संघात स्थान देण्याचे कालच संकेत दिल्यामुळे त्याच कसोटी खेळण्याचं स्वप्न आज खरोखर पूर्ण होऊ शकत.
भारतीय प्रमाणवेळेनुसार पहिला कसोटी सामना आज सकाळी १० वाजता गॉल येथे सुरु होणार आहे.