दिग्गज फलंदाज रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं दिसत आहे. प्रथम त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीतून ड्रॉप करण्यात आलं. त्यानंतर त्याची कसोटी कारकीर्द संपल्यात जमा आहे. रोहितला आता कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळेल असं वाटत नाही. यानंतर आता रोहितची एकदिवसीय कारकीर्दही धोक्यात आलेली आहे.
वास्तविक, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनू शकतो. सध्या रोहित एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, रोहितला या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती दिली जाईल. रोहित ही मालिका खेळला नाही तर या मालिकेत अष्टपैलू हार्दिक पांड्या भारतीय संघाचं नेतृत्व करेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. शिवाय आता त्याच्याकडे कर्णधारपदाचाही खूप अनुभव आहे. भविष्याकडे पाहता, तो दीर्घकाळ संघाची कमान सांभाळू शकतो. यामुळे 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाची तयारी करणं सोपं होईल.
एकीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्याची मागणी होत असताना, आता एकदिवसीय फॉरमॅटमध्ये हार्दिक कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार म्हणून उदयास येत आहे. तसेच शुबमन गिलकडे देखील भावी कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. परंतु टीम मॅनेजमेंट त्याला सध्याच ही जबाबदारी देण्याच्या विचारात नाही. मॅनेजमेंटच्या मते गिलला आणखी थोडं परिपक्व होण्याची गरज आहे.
हेही वाचा –
रोहितला ड्रॉप करण्यामागे केवळ गौतम गंभीरचा हात नाही, या व्यक्तीच्या सांगण्यावरून घेण्यात आला निर्णय
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची अवस्था वेस्ट इंडिजपेक्षाही वाईट, दोन वर्षांत पाचव्यांदा असं घडलं
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर राडा! नवख्या कॉन्स्टन्सला बुमराहनं शिकवला धडा