वनडे विश्वचषक समाप्तीनंतर सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात आयपीएल 2024 ची चर्चा सुरू आहे. सध्या आयपीएलची ट्रेडिंग विंडो सुरू असून, 26 नोव्हेंबर रोजी हा कालावधी संपन्न होत आहे. त्यानंतर संघ आपण कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. त्याच ट्रेडिंगबाबत आता एक मोठी बातमी समोर येत असून, गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या हा पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सकडे येऊ शकतो.
आयपीएल ट्रेडिंग विंडोमध्ये आत्तापर्यंत तीन ट्रेड झालेले आहेत. लखनऊ संघाकडून रोमारिओ शेफर्ड हा मुंबई इंडियन्सकडे पोहोचला आहे. तर राजस्थान रॉयल्सने देवदत्त पडिक्कल याला लखनऊकडे पाठवत वेगवान गोलंदाज आवेश खान याला आपल्याकडे खेचले आहे. त्यानंतर आता हार्दिक पंड्या हा देखील मुंबईकडे जाऊ शकतो, असे म्हटले जातेय.
एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, सध्या मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यामध्ये हार्दिक पंड्याच्या ट्रेडविषयी चर्चा सुरू असून, हार्दिक हा पुन्हा मुंबईकडे येण्याची दाट शक्यता आहे. तसेच गुजरात संघ व्यवस्थापन शुबमन गिल याला भविष्यातील कर्णधार म्हणून तयार करू इच्छित असून, त्याच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल.
हार्दिक याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये मुंबई इंडियन्ससोबत केली होती. मुंबईला त्यानंतर चार विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा राहिला. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघ सहभागी झाल्यानंतर 2022 मध्ये हार्दिकने गुजरात संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्याच्या नेतृत्वात गुजरातने पहिल्याच हंगामात विजेतेपद पटकावले. त्यानंतर दुसऱ्या हंगामातही त्याने गुजरातला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते.
(Hardik Pandya Might Trade To Mumbai Indians For IPL 2024)
हेही वाचा-
T20 World Cup 2024: पाकिस्तानी माजी कर्णधाराची काळजी तर पाहा; म्हणतोय, ‘रोहित-विराटला टी20 वर्ल्डकपमध्ये…’
सूर्यासोबत काय चर्चा करून इशानने ऑस्ट्रेलियन स्पिनरला दिला चोप? स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘मला जोखिम…’
टीम इंडियातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘लोक मला सर्वात दुर्दैवी क्रिकेटर…’