Hardik Pandya- Natasha Stankovic Divorce :- भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने गुरुवारी (18 जुलै) मोठा निर्णय घेत पत्नी नताशा स्टॅनकोविक हिला घटस्फोट दिला. दोघांनीही संमतीने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तर मुलगा अगस्त्यची जबाबदारी दोघांकडेही असेल, असे त्यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्ट केले. पण पत्नीपासून वेगळा होणारा हार्दिक पहिलाच भारतीय क्रिकेटपटू नाही. त्याच्यापूर्वीही काही भारतीय क्रिकेटर्सच्या संसारात मिठाचा खडा पडला आहे. कोण आहेत ते क्रिकेटपटू? जाणून घेऊया…
असे भारतीय क्रिकेटपटू ज्यांचा घटस्फोट झाला
- दिनेश कार्तिक
माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रिण निकिता बंजारासोबत 2007 मध्ये लग्न केले. या लग्नासाठी त्यांनी बराच वेळ घेतला प्लानिंग केले होते. त्यांच्या कुटुंबांमध्ये बराच काळ चांगले संबंध होते, परंतु दिनेशचे लग्न केवळ 5 वर्षे टिकू शकले. 2012 मध्ये, दिनेशची पत्नी आणि त्याचा सहकारी मुरली विजय यांचे अफेयर सुरू झाले. त्यामुळे दिनेशने निकीताला घटस्फोट दिला. त्यानंतर दिनेशने 2015 मध्ये स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केले. आता त्यांना कबीर आणि झियान नावाची दोन जुळी मुले आहेत. - शिखर धवन
भारतीय सलामीवीर शिखर धवनची प्रेमकहानी खूप फिल्मी राहिली होती. परंतु त्याचाही संसार जास्त काळ टिकू शकला नाही आणि त्याला घटस्फोटाचे दु:ख सहन करावे लागले. 2009 मध्ये मेलबर्नमध्ये शिखर धवन आणि 2 मुलींची आई असलेल्या आयशा मुखर्जी यांचा साखरपुडा झाली आणि त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. दोघांचे लग्न 11 वर्षं टिकले. मात्र, दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि मानसिक छळाच्या कारणावरून 2023 मध्ये धवनने आयशाला घटस्फोट दिला. आयशा आणि तिचा मुलगा झोरावर हे ऑस्ट्रेलियात राहतात. - विनोद कांबळी
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीने 1998 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण नोएला लुईसशी लग्न केले. मात्र नंतर त्याच्यावर पत्नीवर अत्याचार आणि छळ केल्याचा आरोप करण्यात. यानंतर 2005 साली त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विनोदने ख्रिश्चन धर्म स्वीकारून मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. - मोहम्मद अझरुद्दीन
भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा एकदा नव्हे तर दोनदा घटस्फोट झाला आहे. त्याने 1996 मध्ये पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला आणि बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. मात्वर संगीतासोबतचे त्याचे लग्न 14 वर्षेच टिकले आणि त्याने संगीता बिजलानीशी घटस्फोट घेतला. पहिल्या पत्नीपासून अझरुद्दीनला दोन मुले आहेत. - मोहम्मद शमी
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहानबद्दल कोणाला माहिती नाही. मोहम्मद शमीने 2014 मध्ये हसीन जहानशी लग्न केले. दोघांची पहिली भेट आयपीएलदरम्यान झाली होती. हसीन जहान त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर होती. मात्र लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 2018 साली हसीन जहानने शमीवर आरोप केले की, त्याचे इतर मुलींशी अफेअर आहे. तिने शमीवर घरगुती हिंसाचाराचाही आरोप केला. तेव्हापासून दोघेही वेगळे राहतात. मात्र, दोघांचेही प्रकरण अद्याप न्यायालयात अडकले आहे. शमीला आयरा नावाची एक मुलगीही आहे, जी हसीन जहानसोबत राहते. - योगराज सिंग
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी शबनम कौरशी लग्न केले आणि या जोडप्याला दोन मुले झाली. असे म्हटले जाते की शबनम कौरच्या करिअरच्या इच्छेला योगराज यांनी पाठिंबा दिला नाही, ज्यामुळे ते वेगळे झाले. शबनमशी फारकत घेतल्यानंतर योगराजने सतबीर कौरशी लग्न केले. दुसऱ्या लग्नापासून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. - जवागल श्रीनाथ
भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने त्याची पहिली पत्नी ज्योत्स्ना हिच्याशी 1999 मध्ये लग्न केले. पण हे लग्न अयशस्वी झाले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2008 मध्ये माजी भारतीय वेगवान गोलंदाजाने माधवी पत्रावली नावाच्या पत्रकाराशी लग्न केले.
महत्त्वाच्या बातम्या-
ईशान किशनच्या करिअरला ब्रेक? भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आता एकच मार्ग
गाैतम गंभीरची गुगली! या खेळाडूच्या निवडीने केले सर्वांना आश्चर्यचकित
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!