भारतीय संघानं बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेला शानदार सुरुवात केली आहे. ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा एकतर्फी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यातील टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा एक जबरदस्त शॉट व्हायरल होत आहे. त्यानं अक्षरश: न बघता हा शानदार शॉट मारला!
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19.5 षटकांत केवळ 127 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, टीम इंडियानं हे लक्ष्य केवळ 11.5 षटकांत 3 गडी गमावून गाठलं. भारताकडून हार्दिक पांड्या, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी शानदार फलंदाजी केली.
हार्दिक पांड्यानं अवघ्या 16 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 39 धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान हार्दिकनं एक शॉट मारला, ज्याची खूप चर्चा होत आहे. डावाच्या 12व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिकनं हा ‘नो लुक’ शॉट मारला. बांगलादेशच्या तस्किन अहमदनं हार्दिकला बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हार्दिकनं चेंडूकडे न पाहता तो कट केला आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेनं चौकाराला गेला. हार्दिकचा हा शॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या शॉटचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.
Swag of Hardik Pandya 🤟🥶#Hardikpandya #INDWvsPAKW #indvsban #MayankYadav #SuryakumarYadav #SinghamAgain pic.twitter.com/wUJ3JJIXWl
— Sachin Yadav (@sachinjnp04) October 6, 2024
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 हून अधिक धावांचा पाठलाग करताना शिल्लक चेंडूंच्या बाबतीत भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्धचा सामना भारतानं 49 चेंडू शिल्लक असताना जिंकला. या सामन्यात हार्दिक पांड्यानंही एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं 5व्यांदा षटकार मारून भारतासाठी टी20 सामना जिंकला आणि विराट कोहलीला मागे टाकलं. कोहलीनं हा पराक्रम चार वेळा केला आहे.
हेही वाचा –
उपांत्य फेरीच्या शर्यतीत अडकला भारत, पाकिस्ताननं बिघडवलं समीकरण; गणित जाणून घ्या
प्रीती झिंटाच्या संघानं जिंकली पहिली टी20 ट्रॉफी, आरसीबी कर्णधाराच्या नेतृत्वात कमाल कामगिरी!
पहिला ओव्हर मेडन, दुसऱ्यामध्ये विकेट! मयंक यादवनं पदार्पणातच केलं भल्या-भल्यांना गार!