भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान आशिया चषक 2022 मधील सुपर फोर सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने वेगवान धावा बनवल्या. मात्र, एका बाजूने सातत्याने बळी देखील गमावले. साखळी फेरीच्या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार राहिलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात फलंदाजी करताना अपयशी ठरला.
भारतीय संघाने दमदार सुरुवात केल्यानंतर आपले दोन्ही सलामीवीर ठराविक अंतराने गमावले. विराट कोहली याने एक बाजू लावून धरली मात्र, सूर्यकुमार यादव व रिषभ पंत हे देखील फार काळ टिकू शकले नाहीत. रिषभ बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेला हार्दिक पंड्या अपयशी ठरला. त्याला मोहम्मद हसनेनने खातेही खोलू न देता शून्यावर बाद केले.






