जानेवारी 2020 मध्ये, भारतीय अ संघ न्यूझीलंड दौर्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय अ संघ न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 3 वनडे आणि 2 चार दिवसीय कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकांसाठी बीसीसीआयने भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे.
या संघातील वनडे सामन्यासाठी हार्दिक पंड्याला भारतीय अ संघात स्थान देण्यात आले आहे. तो मागील अनेक दिवस दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर होता. पण आता तो दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय मालिका खेळण्यापूर्वी त्याला बीसीसीआयने भारत अ संघात स्थान दिले आहे. या द्वारे तो तंदुरुस्ती सिद्ध करु शकतो.
त्याच्याबरोबर पृथ्वी शॉ मयंक आणि अगरवाल या दोघांनाही वनडे तसेच चार दिवसीय कसोटी सामन्यांच्या मालिकांसाठी भारताच्या अ संघात स्थान देण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त वनडे मालिकेसाठी संजू सॅमसन आणि इशान किशन यष्टीरक्षक म्हणून संघात असतील तर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी केएस भरत आणि इशान किशनची यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे आणि दुसऱ्या सामन्यासाठी भरतसह वृद्धिमान सहा यष्टीरक्षक म्हणून संघात आहे.
त्याचबरोबर वनडे मालिकेसाठी भारत अ संघाचे कर्णधारपद युवा क्रिकेटपटू शुबमन गिलकडे सोपवले आहे. कसोटी मालिकेत भारत अ संघाचे नेतृत्व हनुमा विहारी करेल.
भारत अ संघ विरुद्ध न्यूझीलंड अ संघामधील या मालिकांदरम्यान भारताचा वरिष्ठ संघही न्यूझीलंड दौऱ्यावर असेल.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी असे आहेत भारत अ संघ –
वनडे मालिका –
पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल (कर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, अक्षर पटेल, राहुल चाहर, संदीप वॉरीयर, ईशान पोरेल, खलील अहमद, मोहम्मद सिराज
पहिला चार दिवसीय कसोटी सामना –
पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यु इस्वरन, शुबमन गिल, हनुमा विहारी (कर्णधार), केएस भारत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शाहबाज नदीम, राहुल चाहर, संदीप वॉरियर, अवेश खान, मोहम्मद सिराज, ईशान पोरेल, ईशान किशन(यष्टीरक्षक)
दुसरा चार दिवसीय कसोटी सामना –
पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हनुमा विहारी (कर्णधार), के एस भारत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, आर अश्विन, शाहबाज नदीम, संदीप वॉरियर, अवेश खान, मोहम्मद सिराज, ईशान पोरेल
आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा कायम
वाचा- 👉https://t.co/PPByko2LXj👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi
— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019
बुमराहचे झाले कमबॅक; ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
वाचा👉https://t.co/ISxcTSVj6O👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019