---Advertisement---

माझ्यासाठी ही नवी सुरुवात असली तरी फलंदाजी करणे विसरलेलो नाही – शिखर धवन

---Advertisement---

भारताचा उत्कृष्ट फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) 2019 या वर्षात बऱ्याच दुखापतींना सामोरे गेला आहे. त्यामुळे त्याला अनेक सामन्यांना मुकावेही लागले आहे. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलने सलामीला फलंदाजी करताना चांगली कामगिरी करत आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यामुळे दुखापतीनंतर भारतीय संघातील पुनरागमन धवनसाठी नक्कीच सोपे असणार नाही.

परंतू तरीही मी अजून फलंदाजी करणे विसरलो नाही, असे म्हणत धवनने नव्या वर्षात नवी सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे. तो सध्या हैद्राबाद विरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळत असून या सामन्यात तो दिल्लीचे नेतृत्वही करत आहे.

त्यानंतर तो 5 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल.

“ही माझ्यासाठी नवी सुरुवात आहे. प्रथमत: माझ्या बोटाला, मानेला, डोळ्याला दुखापत झाली. त्यानंतर, गुडघ्याला टाके घातले. नवीन वर्ष येत आहे ही चांगली गोष्ट आहे. मला आनंद होतोय की केएल राहुलने खूप चांगली कामगिरी केली आणि संधीचा पुरेपुर फायदा घेतला,” असे राहुलबद्दल आणि त्याच्या दुखापतीबद्दल सराव सत्रानंतर पत्रकारांशी बोलताना धवन म्हणाला.

“हे सत्र महत्त्वपूर्ण आहे. मला श्रीलंकेविरुद्ध टी20मध्ये (T20) चांगली कामगिरी करायची आहे. परंतु, संघ निवडण्याचे संघ व्यवस्थापनाचे काम आहे. ते आपले काम करतील आणि मी माझे काम करेल. मी मोठी खेळी खेळण्यासाठी खूप उत्सूक आहे,” असेही धवन यावेळी म्हणाला.

त्याचबरोबर धवन तंदुरुस्तीबद्दल बोलताना म्हणाला की, “जर तुम्ही आंतरराष्ट्रीय कसोटी मालिका खेळला असाल, तर तुम्हाला त्या खेळाडूला विश्रांती द्यायला पाहिजे. जेणेकरून तो तंदुरुस्त राहील. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा विश्रांतीला प्राथमिकता दिली जाते.”

“आम्ही पण मनुष्य आहोत, मशीन नाही. त्यामुळे  आपल्याला मानसिक आणि शारीरिकरित्या तंदुरुस्त असण्याची गरज आहे,” असेही धवन यावेळी म्हणाला.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.

धवनने आतापर्यंत 58 टी20 सामन्यांमध्ये 27.85 च्या सरासरीने 1504 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1209683418440597504

https://twitter.com/Maha_Sports/status/1209476980673957890

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---