भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याला न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. यावेळी तो मैदानापासून दूर असून आपला वेळ शानदार पद्धतीने घालवत आहे. न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, एकदिवसीय मालिकेतून त्याला आराम देण्यात आला. त्यानंतर तो आपल्या घरी परतला आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला. नुकतेच त्याला दुबईमध्ये त्याच्या जुन्या सहकारी खेळाडूंसोबत मजा-मस्ती करताना बघितल्या गेले. त्यातच त्यानेे जाहिरातींसाठी वेळ काढला आणि यादरम्यान चित्रीकरण्याच्या वेळी काढलेले व्हिडीओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या मजेशीर व्हिडीओत मस्ती करताना दिसला आणि काही पडद्यामागील क्षण देखील त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केेले. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहीलय की, ‘या प्रकारे झाल्या गोष्टी’. या व्हिडीओ खाली त्याच्या पत्नीने कमेंट केली आणि इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले. हार्दिकने याआधी आपल्या लहान मुलासोबत वेळ घालवला होता आणि याचे फोटो त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले होते.
https://www.instagram.com/reel/Clc-yQyvbF2/?utm_source=ig_web_copy_link
यादरम्यान हार्दिकनेे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याची देेखील भेट घेतली. सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात हार्दिक पंड्या आणि धोनी सोबत आहेेत. असे म्हटले जात आहे की हा फोटो दुबईमधील आहे. या दोन खेळाडूंचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होतोय, ज्यात ते ‘काला चष्मा’ या गाण्यावर नाचताना दिसले.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानेे न्यूझीलंड विरुद्ध टी20 सामन्यांची मालिका खेळली. या मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. त्यातच बे ओवलमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर खेळला गेलेला तिसरा सामना डकवर्थ लुईस नियमाच्या मदतीने टाय झाला आणि भारताने ही मालिका 1-0च्या फरकाने जिंकली.(Hardik Pandya shared ‘behind the scenes’ video on his Instagram account)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्याची देविका घोरपडे स्पेनमध्ये चमकली! युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले गोल्ड
‘या’ 2 कारणांमुळे संजू सॅमसन सारखाच होतोय टीम इंडियातून बाहेर? वसीम जाफरचा संघ व्यवस्थापनावर निशाणा