---Advertisement---

हार्दिकला येतेय वडिलांची आठवण, शेअर केला भावनिक व्हिडिओ

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 11:25 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. हेच कारण आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतो. मंगळवारी (२ फेब्रुवारी) दुपारी हार्दिकने आपल्या वडिलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्यांना एक ‘सरप्राईज गिफ्ट’ देताना दिसत आहे.

वडिलांना दिली होती कार भेट

हार्दिक पंड्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये वडील हिमांशु पंड्या एका कार शोरूममध्ये गेलेले दाखवले आहेत. सेल्समन जेव्हा त्यांना कारबद्दल सांगतो तेव्हा ते म्हणतात की, मला ही कार हवी आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईक त्यांना सांगतात की, ही कार आता तुमची आहे. हिमांशु पंड्या यांना ही गाडी आपली आहे हे कळल्यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून येत आहे.

हार्दिकने लिहिले भावनिक कॅप्शन

हार्दिक पंड्या याने व्हिडिओ सोबतच्या कॅप्शनमध्ये भावनिक संदेश लिहिला आहे. त्याने लिहिले की, ‘तुम्ही आत्ता आमच्या बरोबर नाही. ही गोष्ट मला खूप रडू आणते. नुकतीच कँडी मिळालेल्या मुलासारखे तुम्हाला हसताना पाहून माझ्या चेहऱ्यावर ही हसू फुटते. लव यू बाबा.’ हार्दिक मागील काही दिवसांपासून आपल्या वडिलांच्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक करत आहे. हार्दिक लहानपणापासून आपल्या वडिलांच्या अत्यंत जवळचा आणि लाडका होता.

https://www.instagram.com/tv/CKx4ckcF2f4/?utm_source=ig_web_copy_link

हृदयविकाराच्या झटक्याने झाले हार्दिकच्या वडिलांचे निधन

मागील महिन्यात हार्दिकच्या वडीलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. मोठा मुलगा कृणाल त्यावेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी बडोदा संघात समाविष्ट होता. हु दुःखद बातमी मिळाल्यानंतर त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर हार्दिक इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात सहभागी होण्यासाठी चेन्नईमध्ये दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या या तीन खेळाडूंना मिळू शकते आयपीएलचे तिकीट

चाहत्यांच्या स्वागताने भारावला नटराजन, केले हे खास ट्विट

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालविरुद्ध अखेर बेंगळुरूला विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---