---Advertisement---

पंड्या बनणार भारताचा टी-20 कर्णधार? माजी दिग्गजाने सांगितला रोहित-विराटला संघातून बाहेर करण्याचा योग्य मार्ग

On: शनिवार, नोव्हेंबर 25, 2023 4:53 PM
Hardik Pandya
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला वनडे विश्वचषक 2023चा किताब नावावर करता आला नाही. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 6 विकेट्सने पराभूत झाला. ऑस्ट्रेलियाने इतिहासातील सहावा विश्वचषक जिंकला. मागच्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी-20 कारकिर्दीबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी दिग्गज शोएब अख्तर याने हार्दिक पंड्या याच्यासाठी अप्रत्यक्षपणे काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.

वनडे विश्वचषक 2023मध्ये भारतीय संघ रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात अप्रतिम खेळला. सुरुवातीच्या 10 पैकी 10 सामने भारताने जिंकले. पण अंतिम सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला. रोहितच्या वनडे कारकिर्दीतील हा शेवटचा वनडे विश्वचषक असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही, तर पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकातून देखील रोहित माघार घेऊ शकतो, असा चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याची प्रतिक्रिया महत्वाची ठरते.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) मागच्या जवळपास एका वर्षामध्ये देशासाठी एकही टी-20 सामना खेळले नाहीत. अशात या दोन्ही दिग्गजांच्या अनुपस्थितीमध्ये हार्दिक पंड्या आघामी काळात भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. आगामी वनडे विश्वचषकात देखील रोहित खेळताना दिसणार नाही, असे सांगितले जात आहे. रोहित आणि विराटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाहीये. पण शोएब अख्तरच्या मते जर रोहित आणि विराट भविष्यात टी-20 क्रिकेट खेळले नाहीत, तर हार्दिक पंड्याने या दोघांना सन्मानपूर्वक निरोप दिला पाहिजे.

अख्तरच्या मते रोहित शर्मापेक्षा चांगला सलामीवीर भारताकडे नाही. तसेत त्याच्या विश्वचषकातील प्रदर्शनाचेही कौतुक त्याने केले. अख्तर म्हणाला, “जर तुम्ही रोहित आणि कोहली यांच्यामध्ये अजून क्रिकेट बाकी आहे. तुम्हाला विश्वचषकासारख्या स्पर्धेत रोहित शर्मापेक्षा चांगला सलामीवीर फलंदाज मिळू शकतो का? नाही मिळू शकत.”

“जेव्हा धोनी भारताचा कर्णधार बनला, तेव्हा सचिन तेंडुलकर याला त्याने सन्मानपूर्वक भाजूला केला. विराट कोहली कर्णधार बनला, त्याने धोनीला महत्व दिले. तसेच रोहित संघाचा कर्णधार बनल्यानंतर त्याने विराटचा केलेला सन्मान आपण पाहिला आहे. आता हार्दिक पंड्या या दोन दिग्गजांचा सन्मान कशा पद्धतीने करतो, हे त्याच्या हातात आहे. स्वतःचे पाय जमिनी कसे टिकवून ठेवतो, हे पाहण्यासारखे असेल. पूर्ण आदराने या दोघांना निरोप द्यावा लागेल, ज्यासाठी ते पात्र आहेत. माझ्या बोलण्याने हार्दिकवर दबाव येऊ शकतो, पण त्याने रोहित आणि कोहलीला तो आदर द्यायला हवा. त्यांच्यामुळेच हार्दिक संघात आहे. आता उपकारांची परतफेड झाली पाहिजे,” असे अख्तर पुढे म्हणाला.

दरम्यान, हार्दिक पंड्या मागच्या जवळपास एका वर्षापासून टी-20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करत आहे. त्याला बीसीसीआयकडून टी-20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार घोषित केले गेले नाहीये. पण येत्या काळात अशी घोषणा केली जाऊ शकते. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यापैकी 10 सामन्यात संघाला विजय, तर 5 सामन्यात पराभव मिलाला आहे. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याच्याच नेतृत्वात विजेतेपद पटकावले होते. (Hardik Pandya should give a respectful farewell to Rohit Sharma and Virat Kohli from t20i)

महत्वाच्या बातम्या – 
WPL 2024: लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
रोहितचा Future Plan आला समोर, विराटबद्दलही मिळाली माहिती; वाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याशी संबंधित अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---