---Advertisement---

‘भावा आयपीएल संपलीये’, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पंड्याने घेतली मिलरची फिरकी

On: शुक्रवार, जून 10, 2022 8:10 PM
David-Miller-Hardik-pandya
---Advertisement---

क्रिकेट जगतात ‘किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेविड मिलरचा आज (१०जून) रोजी जन्मदिवस आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मिलरने भारता विरुद्ध खेळलेल्या पहिल्या टी२० सामन्यांत तुफान खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देली. त्या सामन्यानंतर दिल्ली विमानतळावर हार्दिक पंड्याने मिलर सोबत काढलेला सेल्फी पोस्ट करत मिलरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मिलर यंदाच्या आयपीएल हंगामात विजयी ठरलेल्या गुजरात टायटन्स कडून खेळला आहे. हार्दिक याच संघाचा कर्णधार आहे. या दोघांनाही अनेक सामन्यांत एकत्रिक फलंदाजी करताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. हार्दिक पंड्याने याच आपल्या साथीदाराला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. “हॅपी बर्थडे मिली, पण आयपीएल आता संपली आहे” असे मजेशीर कॅपशन देत हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करत मिलरला शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिकने दिलेल्या शुभेच्छा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.

Hardik-Pandya-Story
Photo Courtsey : Instagram/HardikPandya

डेविड मिलरने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यांत ३१ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी केली. एकेवेळी अशक्य वाटणारे लक्ष्य मिलरच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने सहजपणे साध्य करता आले. मिलरने या सामन्यांत आपला आयपीएलमधला फॉर्म चालू ठेवला. त्यामुळेच हार्दिकने पोस्टला मजेशीर कॅपशन देत मिलरला आयपीएल संपल्याची आठवण करून दिली आहे.

दरम्यान, मिलरने यंदाच्या आयपीएल हंगामात एकूम १६ सामन्यांमध्ये ६८च्या सरासरीने आणि १४२.७२च्या तुफानी स्ट्राईक रेटने ४८१ धावा केल्या. यापैकी त्याने सर्वाधिक ९४ धावांची खेळी केली होती. हार्दिक पंड्या आणि शुभमन गील नंतर मिलरने गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

इकडं भारत हारलाय अन् तरीही पाँटिंग म्हणतोय पंत आहे ‘खतरनाक’ खेळाडू, काय आहे कारण?

झहीर खानने रिषभ पंतला सुनावले, म्हणाला ‘या’ गोलंदाजाचा योग्य वापर केला नाही

आयसीसीने बुमराहला घातलीय मानाची ‘टोपी’, पण का केला गेलाय ‘बूम बूम’चा सन्मान?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---