---Advertisement---

‘या ६ महिन्यांत मला झालेला त्रास कोणालाही माहिती नाही,’ हार्दिक पंड्याने व्यक्त केली हळहळ

On: शनिवार, जून 11, 2022 1:39 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल १५च्या हंगामात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने जोरदार पुनरामन केले. त्यानंतर त्याला भारतीय संघात देखील स्थान देण्यात आले. सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेत त्याला संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचवेळी हार्दिकने गेल्या काही काळात दुखापतग्रस्त असतानाच्या काही दु:खद आठवणींना उजाळा दिला आहे. 

हार्दिक पंड्या म्हणतो की, “त्याने स्वबळावर लढाई जिंकली. मी आनंदी आहे. इतर गोष्टींप्रमाणे मी स्वतःविरुद्धची लढाई जिंकली आहे. आयपीएल जिंकणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. अनेकांना संशय आला. आमचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. पुनरागमनाबद्दल माझ्याबद्दल बरेच काही बोलले जात होते. मात्र, मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.”

हार्दिकने पुनरागमनासाठी खास योजना आखली होती. हार्दिक चार महिन्यांपासून दररोज पहाटे ५ वाजता उठायचा आणि रात्री ९.३० वाजताच झोपायचा. पंड्या म्हणाला की, “मी अशी उत्तरे देणारा कधीच नव्हतो. माझ्या पुनरागमनाचा मला अभिमान आहे. ६ महिने चाललेल्या वेदना कोणालाच माहीत नाहीत.”

गेल्या वर्षीच्या टी२० विश्वचषकानंतर हार्दिक पंड्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली होती. या सामन्यात हार्दिक पांड्याने १२ चेंडूत ३१ धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय हार्दिक पांड्याने आयपीएलच्या १५ सामन्यांमध्ये ४८७ धावा केल्या आहेत.

दरम्यान, पंड्या आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार होता आणि त्याने स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने हंगामातील १५ सामन्यांमध्ये ४४.२७च्या सरासरीने आणि १३१.२६च्या स्ट्राईक रेटने ४८७ धावा केल्या. काही महिन्यांपूर्वी खराब प्रदर्शनाच्या कारणास्तव भारतीय संघातून बाहेर पडलेला हार्दिक आयपीएलनंतर पुन्हा संघात परतला आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा-

‘…म्हणून टी२० विश्वचषकासाठी उमरानला संघात घेऊ नका’,रवी शास्त्रींच्या विधानाने माजली खळबळ

‘असे अनेक खेळाडू येतात आणि गायब होतात!’, कपिल देव यांनी उमरानबद्दल केले मोठे विधान

दुसऱ्या टी२० सामन्यांत भारतीय संघात होणार दोन मोठे बदल, ‘या’ खेळाडूंची होणार हकालपट्टी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---